पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वचन सिद्धान्त सार संपादक - डॉ. फ. गु. हळकट्टी, अनुवादक - प्रा. आर. एम. करडीगुद्दी प्रकाशक - महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान, भालकी, जि. बिदर (कर्नाटक) पृ. १२१०, मूल्य - रु. १०००/- (सवलत ५०%) प्रकाशन वर्ष - २०१६



वचन सिद्धांत सार

 भारतीय संत परंपरेत काही संत हे पुरोगामी म्हणून ओळखले जातात.हिंदीत कबीरदास, मराठीत तुकाराम तर कन्नडमध्ये बसवेश्वर. संत बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे पुनरुज्जीवन केले. कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी मानली जाते. धर्म, समाज, तत्वज्ञान, साहित्य इत्यादी क्षेत्रातील त्यांचे कार्य क्रांतिकारकच म्हणावे लागेल. त्यांनी आपल्या जीवनकाळात 'अनुभवमंटप' (मंडप) चा जो प्रघात पाडला होता, तो जागतिक धर्मांच्या इतिहासात अभिनव ठरला. या अनुभव मंडपात सर्व जाती, धर्माच्या लोकांना प्रवेश असे. बाराव्या शतकाचा काळ लक्षात घेता, हे काम धाडसाचे निश्चितच होते. चर्चेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांनी जी धर्म जागृती घडवून आणली, ती वर्तमान लोकशाहीपूरकच म्हणावी लागेल. या चर्चेतून जी धर्मवचने निश्चित झाली ती कन्नडमध्ये 'वचन साहित्य' म्हणून प्रसिद्ध आहेत. ही वचने अनेकांनी लिहिली. सन १९२३ मध्ये डॉ. फ. गु. हळकट्टी यांनी कन्नडमध्ये 'वचनशास्त्र' सार (भाग-१) संपादित करून प्रकाशित केला होता. त्याचे परिष्करण सन १९८१ मध्ये डॉ. एम. एम. कलबुर्गी व डॉ. वीरण्णा बी. राजूर यांनी केले. डॉ. एम. एम. कलबुर्गी वचन साहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. संत

वाचावे असे काही/५२