पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र, हिंद पॉकेट बुक्स, जी.टी. रोड, शाहदरा, दिल्ली - ४०००३२, प्रकाशन - १९७०, पृष्ठे - १५२, मूल्य - ३ रु.



प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र

 'प्रेम' अडीच अक्षरांचाच शब्द! असं सांगितलं जातं की त्यात सारं जग सामावलेलं असतं. तरुणपणात ज्याच्या मनात प्रेम निर्माण झालं नाही असा माणूस विरळाच! माणसं प्रेम व्यक्त करतात फुलातून, डोळ्यातून नि पत्रातूनही! जागतिक साहित्यात प्रेमपत्रे ही ललित काव्य म्हणून श्रेष्ठ मानली गेली आहेत. मुळात प्रेमपत्रे वाचणे ही एक रोमँटिक अनुभूती! असं सांगितलं जातं की आपल्याला आलेल्या प्रेमपत्रापेक्षा दुसऱ्याला आलेली प्रेमपत्रे वाचणं त्याची मजा काही औरच! पूर्वी प्रेमपत्र गुलाबी कागदावर लिहिली जायची. पाकिटावर लिहिलेलं असायचं, 'मालकाशिवाय फोडू नये'. ओळखायचं हे प्रेमपत्रच असणार. अशी पत्रे लिहिणारे कोणकोण? श्वास रोखून वाचा तर... अब्राहम लिंकन, नेपोलियन, रूसो, लेनिन, किटस्, बायरन, टेनीसन, टॉलस्टॉय, फ्राइड, वर्डस्वर्थ, जॉर्ज बर्नार्ड शॉ, व्हिटर ह्यूगो, मेरी क्यूरी, राणी व्हिक्टोरिया इत्यादी इत्यादी. अशा जगप्रसिद्ध व्यक्तींच्या प्रेमपत्रांचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. पुस्तकाचे नाव आहे, "प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र'. यात एकूण ६३ जगप्रसिद्ध व्यक्तींची पत्रे आहेत.

 सदर संग्रहातील प्रेमपत्रे अनेक प्रकारची आहेत. म्हणजे विवाहापूर्वी

वाचावे असे काही/४८