पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सचित्र चरित्र) लोकवाङ्मय गृह, मुंबई - २५ पृ. २८७ (आर्ट पेपर) किंमत - रु. २०००/- प्रकाशन - २००७



डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठीत उपलब्ध साहित्य विपुल आहे. त्यांच्या जीवन, कार्य, विचारांवरही अनेकांनी लिहिले आहे. त्यांच्या जयंती व स्मृतीदिनी मुंबई व नागपूर येथे त्यांना अभिवादन करणारा जो जनसागर लोटतो, तो मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य खरेदी करीत असतो. या महामानवाने 'शिका, संगठित व्हा आणि संघर्ष करा' चा जो संदेश दलित बांधवांना दिला, तो त्यांनी अंमलात आणल्यामुळे आजचा भारतीय दलित समाज उन्नत जीवन जगतो आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चरित्रात्मक पुस्तके अनेक असली तरी चित्रात्मक चरित्रे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठीत उपलब्ध आहेत. त्यातही लोकवाङ्मय गृह, मुंबईने प्रकाशित केलेले चित्रमय चरित्र उत्कृष्ट म्हणावे लागेल. ते मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे.

 या महान ग्रंथाची मूळ संकल्पना त्या प्रकाशनाचे तत्कालीन व्यवस्थापक व सुविख्यात मुद्रण तज्ज्ञ, कलाकार प्रकाश विश्वासराव यांची. त्यांनी पीटर रूहेचे 'गांधी' हे चित्रात्मक चरित्र पाहिले व त्यांना या चित्रमय चरित्राची कल्पना सुचली. ज्यांनी पीटर रुहेचे 'गांधी' हे चित्रमय चरित्र

वाचावे असे काही/४४