पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नि मी मिळून 'लोकमत' मध्ये 'गुडमॉर्निंग' सदर लिहीत असू. त्या सर्व स्मृतींना उजाळा मिळाला.

 शरद जोशींच्या सन १९८१च्या निपाणीच्या तंबाखू आंदोलनात आम्ही काही प्राध्यापकांनी पाठिंबा म्हणून 'रेल रोको' आंदोलन केले होते. मला एक दिवसाचा तुरुंगवास घडल्याचं आठवतं. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी ऊसाला रास्त भाव मिळावा म्हणून जी पदयात्रा काढली होती, त्यात मी व कॉम्रेड पानसरे पाच पावले पाठिंबा दर्शक चाललो होतो. अशा आंदोलनात तुम्हाला अर्जुन होता आले नाही, तरी तुम्ही एकलव्य व्हायला हवे. मी शेती नसलेला नागरिक असलो तरी शेतकऱ्यांबद्दल माझ्या मनात एक अतूट कृतज्ञता भाव सतत जागा असतो. 'मी जीवन जगतो आहे, त्याचे एकमेव श्रेय असते शेतकऱ्याचे. 'इडा पिडा टळो नि बळीचे राज्य येवो' अशी माझी मनस्वी धारणा आहे, ती एकाच जाणिवेमुळे की हा कृषीप्रधान देश. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटली तरी इथल्या शेतकऱ्याचे दैन्य सरत नाही. शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आत्महत्या सत्र थांबत नाही. कर्जमाफीसाठी इथे अजून 'संघर्ष यात्रा' काढावी लागते. इथल्या सर्वकाळच्या शासनास हे केव्हा कळणार की शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश समृद्ध होऊ शकणार नाही. 'अंगारवाटा... शोध शरद जोशीं' हे चरित्र बांधाबांधावर वाचले गेले तर हे शक्य आहे. कारण हे चरित्र भारतीय शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेची बखर आहे.

◼◼

वाचावे असे काही/४३