पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगारवाटा.... शोध शरद जोशींचा' भानू काळे ऊर्मी प्रकाशन, पुणे-६७ पृष्ठे - ५१० मूल्य - रु.५००/- प्रकाशन - डिसेंबर, २०१६



अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

 साहित्य संकलन, रक्षण, संपादन, प्रकाशन, संशोधन कार्य करणारे इतिहासकार म्हणून वि. का. राजवाडे यांचा लौकिक होता. या दशकात असे कार्य करणारे 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक भानू काळे यांनी तीन बृहद चरित्रे मराठीस दिली. 'रंग याचा वेगळा' हे दत्तप्रसाद दाभोळकरांचे लेखन व जीवन स्पष्ट करणारे तर दुसरे 'अजुनी चालतोची वाट' हे रावसाहेब शिंदे यांचे जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे. तिसरे आहे 'अंगारवाटा...'. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशींचा यात शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच ते कोल्हापूरचे उद्योगपती वसंतराव घाटगे (घाटगे पाटील आणि कंपनी) यांचे चरित्र देखील या सर्व चरित्रांचा कोल्हापूरशी काही एक संबंध आहे.

 'अंगारवाटा' वाचताना लक्षात येते की शरद जोशी यांचे वडील अनंतराव कोल्हापुरात वार लावून शिकले ते एक अनाथ विद्यार्थी म्हणून. ते तेव्हा इथल्या (बहुधा) आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये शिकत. पुढे ते पोस्ट खात्यात नोकरी करू लागले. ते साताऱ्यात असताना शरद जोशींचा जन्म २ सप्टेंबर १९३५ ला झाला. पार्ले टिळक विद्यालय, मुंबईतून शरद जोशी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मुबईच्याच सिडनम महाविद्यालयातून ते एम.

वाचावे असे काही/४०