पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नळीतूनच भरवत जगवत राहिलो होतो, तो जिवंत असेपर्यंत. आमची शर्थ वर्षातच हरली. आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. तो मानस अरुण शौरींच्या आदित्यसारखाच होता. जुळा भाऊच म्हणाना! अशी मुले, मुली येतच राहात होती. पुढे त्या दशकात अशा मुलांसाठी कार्य करणाऱ्या 'चेतना', 'स्वयंम्', 'जिज्ञासा', 'चैतन्य' अशा एकामागून एक संस्था कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाल्या. मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलो होतो नि आहे. मला वाचकांना अनुभवाने सांगावेसे वाटते की 'कळेल का 'त्याला' आईचे मन?' पुस्तक त्या सर्व तगमगीची कहाणी आहे, ज्यांच्या पोटी बहुव्यंग अपत्य जन्मते. त्यांचे जीवन समस्याबहुल राहते ते, ते बाळ पदरी असेपर्यंत.

◼◼

वाचावे असे काही/३९