पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केवळ अनुकरणीय होय. शिवाय सदर ग्रंथात राजर्षी शाहू महाराजांचा कालपट उलगडून दाखविणारी कालसूची संलग्न केल्याने ग्रंथातील लेखामधील घटना, प्रसंगांचे आकलन व अवलोकन सोपे होऊन जाते. या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी ग्रंथास मार्मिक प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या संबंधातील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकरांचे विधान उद्धृत केले होते. "पृथ्वीच्या पाठीवर अनेक सम्राट झाले असतील, अनेक राजाधिराज गाजून गेले असतील, पण समाजाच्या तळच्या मानवतेवर माणूस म्हणून मायेची पाखर घालणारे राजे फार थोडे झाले असतील. राजर्षी शाहू महाराज हे त्यापैकी एक होत." असे एतद्देशीयांना वाटणे, मी समजू शकतो. पण सातासमुद्रापलीकडे जर्मन विद्वान सिर्क सियांझ यांना ते वाटून लिहिण्यास ते प्रेरित झाले, ही गोष्ट अधिक महत्वाची अशासाठी की ती उर्मी त्यांना जगाच्या सामाजिक सुधारणांचा अभ्यास केल्यानंतर झाली होती. राजर्षी शाहू छत्रपतींच्या संबंधातील हे विश्वभान अधिक प्रसंगोचित होय.

 माझे एक सोनार मित्र आहेत. त्यांच्या पेढीवर मी पूर्वी फुरसतीच्यावेळी बसत असे. श्रावण महिन्यात खेड्यापाड्यातील भगिनी जोडवी वाढवून घ्यायला येत असत. म्हणत, 'अण्णा जोडवी वाढवायची हायता.' त्या माउलीच्या डोळ्यात मी सौभाग्यवृद्धीचं समाधान पाहात असे. तसे समाधान मला या ग्रंथातील सामाजिक न्यायवृद्धीचे वाटते. मध्यंतरीच्या काळात सर्व महाराष्ट्रभर 'सकल मराठा क्रांती मोर्चा'चे आयोजन होत होते. तेव्हा कोल्हापूरच्या ग्रामीण भागात प्रवास करताना गावच्या पारावरच्या झाडाखाली टांगलेल्या फ्लेक्सवरील एका छोट्या वाक्याने मोठा आशय समजावला होता. 'एक मराठा लाख मराठा' ची जाहिरात करणाऱ्या त्या फलकाच्या डोक्यावर लिहिलं होतं, 'यायला लागतंय' त्याच धर्तीवर या ग्रंथाच्या संदर्भात मी म्हणेन 'घ्यायला लागतंय'. हा ग्रंथ लाख घरात गेला तर ते वर्तमानातील खरे मन्वंतर, दिशांतर ठरेल.

 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इथे धरण, तलाव, औद्योगिक वसाहत, व्यापार पेठ वसवली म्हणून येथील रयतेला आज 'राजापण' मिळाले आहे. महेंद्रसिंह टिकेत, शरद जोशी, राजू शेट्टी प्रभृतींनी इथे जी शेतकरी आंदोलने उभारली त्यातून ऊस, कापूस, तुरीस भाव मिळू लागला. या आंदोलनांनी

शेतकऱ्यास 'कर्जाचा तराजू दिड दांडीचा' असल्याचे भान दिले. त्यातून

वाचावे असे काही/३४