पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राजर्षी शाह गौरव ग्रंथ संपा. रमेश जाधव प्रकाशक, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, मुंबई प्रकाशन-२०१६ पृ. १२६८, किंमत रु. ३००/-



राजर्षी शाहू गौरव ग्रंथ

 आधुनिक भारताच्या समाज परिवर्तना संदर्भात सन १९७४ हे वर्ष मन्वंतर घडवून आणणारे ठरले. ते होते राजर्षी छत्रपती शाह महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष. हे अशासाठी दिशांतर घडविणारे ठरले की तेव्हापासून राजर्षी शाहू छत्रपतींच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि मूल्यांकनाची एक सकारात्मक व सामाजिक न्यायाची परंपरा सुरू झाली. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने राजर्षी शाहू गौरव ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याचे संपादक आमदार पी. बी. साळुंंखे होते. तो सुमारे ६०० पानांचा गौरव ग्रंथ त्यावर्षी अवघ्या दहा रुपयाला मिळाला होता, हे आज कुणाला सांगून खरे वाटणार नाही. आणखी एक गोष्ट आज खरी वाटणार नाही की तत्कालीन लोकप्रतिनिधी वाचत होते, व्याख्यान ऐकत होते, पुस्तके खरेदी करत होते, लिहीत होते, संपादन करत होते. आमदार पी. बी. साळुंंखे यांचे व्यक्तिगत ग्रंथालय समृद्ध होते. तसेच नामदार यशवंतराव चव्हाण यांचेपण.

 या गौरवग्रंथाची तिसरी संवर्धित आवृत्ती गेल्या सामाजिक न्याय दिनी (२६ जून, २०१६) कोल्हापुरातच विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झाली. याचे संपादन कार्य राजर्षी शाह महाराजांवर अनेक ग्रंथ लिहिलेल्या डॉ. रमेश जाधव यांनी केले आहे. त्यांनी अपार कष्ट व मेहनत घेऊन हा

वाचावे असे काही/३२