पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कळंबा जेलमध्ये त्यांचे जाणे-येणे घडले नि लक्षात आले की घरोघरी टी.व्ही. असताना जेलमध्ये मात्र अजून रेडिओचेच युग! त्यांनी तुरुंग प्रशासनास ऑफर दिली. मी एक संध्याकाळ तुमच्यासाठी गातो. झाले. 'रंग माझा वेगळा' हा गझल गायनाचा कार्यक्रम ठरला. तिकिटे छापली गेली. पोलीस, तुरुंग, महसूल, सीमाशुल्क (एक्साइज), परिवहन (आर.टी.ओ.) साऱ्यांनी तिकिटे खपवली. मी वृत्तपत्रात लेख लिहिले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात 'एक शाम, गझल के नाम' साकारली. सर्व खर्च जाऊन कळंबा तुरुंगातील बंदी जनांना रंगीत टी.व्ही. मिळाला नि महाराष्ट्रातील सर्व तुरुंगात पुढे टी.व्ही. युग अवतरले.

◼◼

वाचावे असे काही/३१