पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण हे दैनिक नावाचं नसून व्यवहाराने 'लोकमत' झाले असल्याची प्रचिती होय. 'सायोनारा, सायोनारा। वादा निभाऊँगी सायोनारा।' म्हणत नाचणाऱ्या त्या गाण्यातील अभिनेत्रीच्या उदंड उत्साहाने मी हे स्तंभ लेखन केले. 'जो वादा किया वो S S निभाना पडेगा' गुणगुणतच मी वादा पूर्ण केला. "निरोपाचा हा विडा तुम्ही घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा' म्हणत निरोप घेताना मला दुःख, शल्य असेल तर पुढचा शुक्रवार ओकाबोका वाटेल याचेच. स्तंभलेखन लेखकास पण त्या वाराशी, त्या जागेशी जोडत असते. 'आज्जा मेला, नातू झाला' हा जीवनक्रम असल्याने माणसं येतात, जातात. काळ नित्य असतो म्हणून तर रोजच्या सूर्याबरोबर 'लोकमत' ही प्रकाशित होत राहतो. तो अखंड प्रकाशित होत राहावा ही शुभेच्छा! सायोनारा!!

◼◼

वाचावे असे काही/१६३