पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून आलेले ते वेगळेच. म्हणून ती प्रश्न करते -

 धर्मानं आवळलंय आपल्या पंजात अवघ्या जगाला
 एकानं विरोध करून किती मोडणार हाडं?
 आणि दूरवर पसरलेलं हे विषमतेचं जाळं
 कितीसं तुटणार? फाटणार?

 स्त्री सौख्याची भुकेली असते. लक्ष लक्ष स्वप्नं उरी सांभाळत ती बोहल्यावर चढते. तीन दिवसात हाका मारण्याचा प्रसंग येतो, नि अवघ्या तीन महिन्यात तिनं सर्वस्व गमावलेलं असतं -

 स्त्रीला फसवून भोगल्याशिवाय
 भोगाची तृप्ती नाही
 तृप्तीचा सुवासिक ढेकर नाही.

 भोगपूर्ण समाजानं स्त्रीचं विरूप वेश्यारूपात परिवर्तीत करून टाकलं. वेश्या फक्त स्त्रीच असते -

 सगळ्या वेश्या स्त्रियाच असतात
 पुरुष कधीच वेश्या नसतात.

 असं जळजळीत अंजन डोळ्यात घालणाऱ्या कविता आपणास आतून, बाहेरून उसवतात; विचार करायला भाग पाडतात आणि स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार देतात म्हणून त्या वाचायच्या. पुरुषांना परकाया प्रवेश करण्यास भाग पाडणाऱ्या या कविता स्त्रीस तिचं सामाजिक स्थान दाखवून भानावर आणतात.

 जगात आजवर अनेक कवी, लेखक, कलाकार, विचारक यांनी असे मूलभूत प्रश्न विचारले की समाजाने त्यांना बहिष्कृत ठरवलं. पूर्वी गॅलिलिओ, सॉक्रेटिसच्या पदरी तुरुंगवास, विषप्रयोग, क्षमायाचना त्यांच्या पदरी आली. आज अशांना बहिष्कृताचं जीवन जगावं लागत आहे. तसलिमा नसरिन मूळ बांगला देशी. त्यांचं लेखन धर्मविरोधी मानलं गेलं नि त्यांना आपला देश सोडून युरोप, अमेरिकेत राहावं लागलं. सध्या त्या बहिष्कृत, विस्थापित होऊन भारताच्या आश्रयाखाली सुरक्षित जीवन जगत असल्या तरी एकटेपणा खायला उठतोय. मध्यंतरी त्यांना मानसोपचाराची गरज निर्माण झाली होती. दर तीन-पाच वर्षांनी त्यांना देशाकडे आश्रयासाठी याचना करावी लागते. जग प्रगल्भ केव्हा होणार? विचार स्वातंत्र्य केव्हा अजरामर होणार? जात, धर्म, लिंगनिरपेक्ष समाज-मानव समाज, मानवधर्म केव्हा अवतरणार असा प्रश्न करणारी ही कवयित्री आपल्या या सर्व कवितांतून माणसाच्या मनाचा

वाचावे असे काही/१५८