पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतात. पण मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? असा प्रश्न असतो. राणा आयुब ही तरुण, साहसी महिला संपादक हा विडा उचलते. त्यालाही एक कारण घडतं. तिचे मित्र शाहीद आझमी जे आदिवासी हक्कांसाठी लढत असतात त्यांना नक्षलवादी घोषित करून तुरुंगात डांबण्यात येतं.

 हे पुस्तक राणा आयुब यांनी सन २०१० मध्ये गुजरातमध्ये नाव, पोषाख, व्यवसाय इ. बदलून मैथिली त्यागी नाव धारण करून माइक या इंग्रजी फिल्मकाराची साहाय्यक कॅमेरामन असल्याचं भासवून गुजरातमध्ये १९८२, १९८३, १९८५, १९८७ आणि बाबरी मशीद विध्वंसानंतर झालेली १९९२ ची दंगल अशा दशकभराच्या सततच्या धार्मिक दंगलीत प्रथम मुस्लिमांनी हिंदूंच्या केलेल्या हत्या आणि त्याला उत्तर म्हणून नंतरच्या काळात नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या दंगलीत हिंदूंनी केलेल्या मुस्लीम हत्या, दंगली घडवून आणणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, लोकप्रतिनिधी इत्यादींच्या स्टिंग ऑपरेशनचा भाग म्हणून गुप्त कॅमेरे व रेकॉर्डरच्या साहाय्याने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे लिहिलेलं हे पुस्तक. ते मुळात इंग्रजीत सन २०१६ मध्ये प्रकाशित झालं. 'गुजरात फाईल्स : अ‍ॅनॉटॉमी ऑफ एक कवर अप' हे त्याचं मूळ इंग्रजी नाव. राणा आयुब यांनी आपलं हे शोधपत्रिकेचा जागतिक आदर्श गणलं गेलेलं पुस्तक तयार झाल्यावर अनेक मान्यवर इंग्रजी प्रकाशकांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मिनतवाऱ्या केल्या, उंबरे झिजवले पण हाती आला प्रत्येकाकडून नकारच. या आगीचा विस्तव कोणी आपल्या पदरात घ्यायला धजेना. शेवटी राणा आयुब पदरमोड करून स्वतःच्याच पैशाने पुस्तक प्रकाशित करतात. ते प्रकाशित होताच 'बिझनेस स्टैंडर्ड', 'मिंट ऑन संडे', 'द हिंदू', 'फर्स्ट पोस्ट', 'आऊटलूक', 'एनडीटीवी', 'लाइव मिंट', 'द वायरर', 'इंडिया रेजिस्टस', 'न्यूयॉर्क टाइम्स' इ. सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके, वाहिन्या दखल घेऊन लेख, समीक्षा, चर्चा घडवून आणतात.

 याचं मुख्य कारण असतं हे पुस्तक जगापुढे जात नि धर्माच्या नावावर घडवून आणलेल्या दंगली आणि हत्यांचं सत्य पुराव्यासकट जगापुढे मांडतं. त्यामुळे जगाला 'हिंदू हृदय सम्राट', "हिंदू राष्ट्रीय गौरव', 'राष्ट्रीय नेता' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या वर्तमान पंतप्रधानांचा खरा चेहरा दाखवतं. हे पुस्तक गुजरात नि गोध्रा दंगलीचा पर्दाफाश करणारं म्हणून जसं महत्त्वाचं तसंच भारताचं जातीय व धार्मिक कट्टरपण अधोरेखित करणारं म्हणूनही वाचनीय आणि मननीय. या पुस्तकास सन १९९२ च्या बाबरी

वाचावे असे काही/१३९