पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुजरात फाईल्स - राणा आयुब. प्रकाशक - गुलमोहर किताब, मयुर विहार, दिल्ली - ११००९१ प्रकाशन - ऑगस्ट, २०१७ पृ. - २०९ किंमत - रु. २९५/-


गुजरात फाईल्स

 'गुजरात फाईल्स' हे सन २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या मुस्लीमविरोधी सामूहिक हत्येनंतर नरेंद्र मोदींच्या सत्ता दृढीकरणाचं वास्तव चित्रण करणारं पुस्तक. स्टिंग ऑपरेशन करून सतत राजकीय भूकंप घडवून आणणाऱ्या 'तहलका'च्या तरुण, साहसी महिला पत्रकार राणा आयुब यांनी ते लिहिलंय. राणा आयुब या 'तहलका' या शोध पत्राच्या वरिष्ठ संपादक. वय वर्षे १९. आपल्याच वयाच्या इशरत जहाँ या तरुणीस गुजरातचे पोलीस वरिष्ठ अधिकारी अनधिकार व अनधिकृतपणे अटक करून अज्ञातस्थळी ठेवतात. तिचा अमानुष छळ करतात. तिला नि अन्य जीशान जोहर, अहजद अली व जावेद शेख यांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा बनाव करून ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आल्याचं कुभांड रचलं जातं नि एका खोट्या चकमकीत मारलं जातं. विशेष म्हणजे हे सारं गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्या इशारा नि आदेशावर होत राहात असतं. याची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा होत राहाते. पण त्या वेळी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा इतका दबदबा असतो (जो आज देशभर पसरलेला आहे!) की सारेजण दबक्या आवाजात सारंकाही अलबेल नसल्याचं कुजबुजत

वाचावे असे काही/१३८