पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवाळी अंक -
चित्र - २०१७


दिवाळी अंक - २०१७

 'साहित्यिक येति घरा, तोचि दिवाळी-दसरा' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रात दिवाळी अंकांची परंपरा मासिक 'मनोरंजन'ने सन १९०९ मध्ये सुरू केली. त्या मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी पहिला दिवाळी अंक वाचकांच्या हाती वेळेत पडावा म्हणून त्याची छपाई चार छापखान्यात केली होती. महिन्याचा आठवडा नि आठवड्याचा दिवस केल्याशिवाय हे अंक वाचकांच्या हाती संपादक देऊ शकत नसतात हे वास्तव शंभर वर्षे उलटून गेली तरी बदललेले नाही. एवढे करूनही संपादक आपल्या हाती आलेले सर्व साहित्य व जाहिराती आपल्या अंकात देऊ शकत नसल्याने 'येथे जे पडले उणे, अधिक ते विद्वज्जनी साहिजे!' म्हणण्याची नामुष्की संपादकांवर नेहमीच येत असते. मासिक 'मनोरंजन' नंतर मासिक 'मौज'ने दिवाळी अंक प्रकाशित करायला प्रारंभ केल्यानंतर पहिल्या वर्षी २००, दुसऱ्या वर्षी ८२०० तर तिसऱ्या वर्षी (१९९४) तब्बल १२,२०० प्रतींची विक्रमी विक्री करणारा 'मौज' अंक मासिक रूपात नसला तरी दिवाळी वार्षिकाच्या रूपात शतकाकडे वाटचाल करत आहे.

 या वर्षीच्या 'मौज' दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ प्रख्यात चित्रकार नि 👏कलासमीक्षक प्रभाकर कोलतेंचे असून अंतरंग सजावट प्रख्यात चित्रकार

वाचावे असे काही/१३४