पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

How to Read A Book Mortimer Adler and Charles Doren. Simon and Schuster, New York (USA) Year - 1940 Pages -424 Rs.465/-



हाऊ टू रीड अ बुक

 काही दिवसांपूर्वी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या शतकोत्तर रजत जयंतीच्या निमित्ताने एका महाविद्यालयात वाचनाविषयी बोलायला म्हणून गेलो होतो. माझ्या व्याख्यानात मी काय नि का वाचावे असे सूत्र घेऊन बोललो. माझे भाषण संपवून बसणार इतक्यात विद्यार्थ्यांतून एक हात प्रश्न करण्यासाठी वर झाल्याचे लक्षात आले. तो म्हणाला, 'तुम्ही काय नि का वाचावे हे चांगले सांगितले, पण कसे वाचावे ते नाही सांगितले." मी त्याला यथामती उत्तर दिले खरे, पण त्याने माझे समाधान नाही झाले. उत्तर शोधात माझ्या हाती मॉर्टिमर ॲडलर आणि चार्ल्स डोरेनचं एक पुस्तक लागलं. त्याचं शीर्षक म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्नच होता. 'हाऊ टू रीड अ बुक'.

 हे पुस्तक सन १९४० साली लिहिलं गेलं आहे. या पुस्तकाची फ्रेंच, स्वीडिश, जर्मन, स्पॅनिश, इटालियनमध्ये भाषांतरे झाली आहेत. हे पुस्तक वाचनसंबंधी मूलभूत गोष्टी सांगतं. आपणास वाचावं कसं ते प्राथमिक शाळेत शिकवलं जात नसल्याने वाचन कला म्हणून आपलं नैपुण्य प्राथमिकच राहतं. वाचनाचे कितीतरी प्रकार आहेत. खरे म्हणजे प्रगट-वाचन, मौन वाचन, मनन वाचन, चिंतन वाचन, विश्लेषी वाचन, तुलना वाचन इ.

वाचावे असे काही/१२३