पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आत्मकथेइतकेच प्रेरक असतात. सॉक्रेटिस, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सर्वपल्ली राधाकृष्णन, खान अब्दुल गफार खान यांच्यावरील सदर पुस्तकातील व्यक्तिलेख अनेक दुर्मीळ संदर्भानी युक्त आहेत. त्याचं कारण कुरुंदकरांचं चौफेर नि चौरस वाचन होय. 'सॉक्रेटिसचा मृत्यू' लेखात ते म्हणतात, 'इतर कुणाबरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणे चांगले.' माणसाचं मोठेपण चपखल शब्दात व्यक्त करण्याची कुरुंदकरांची हातोटी त्यांना प्रज्ञावंत, बुद्धिवंत ठरवते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या तत्त्वज्ञानावरील हुकमतीमुळे जागतिक दरारा निर्माण करणारं होतं, याची अनेक उदाहरणे कुरुंदकरांनी सांगितली आहेत. राष्ट्रपती होण्यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन् रशियात भारतीय राजदूत होते. तेव्हा स्टॅलिन रशियाचा सर्वेसर्वा होता. तो भल्याभल्यांना भेट नाकारत असे. पण त्यांनी डॉ. राधाकृष्णनना स्वतः भेटायला बोलावले होते. भेटीत स्टॅलिननी सुचविले की रशियात आहात तर इथे लोकांनी उभारलेली संस्कृती पाहून घ्या. भारताच्या उभारणीला त्याचा उपयोग होईल. डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, 'आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरू शकता हे मला माहीतच आहे, पण पृथ्वीवर माणसासारखे वागायला शिकलात का?' हे ऐकूनही त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांना रशिया सोडून जायचा हकूम दिला नाही, कारण तत्त्वज्ञ म्हणून डॉ. राधाकृष्णन् यांची कीर्ती स्टॅलिन जाणून होता.

 प्रा. कुरुंदकर यांनी थोर व्यक्तींवर जसं लिहिलं तसं आपले मित्र, सुहुद, आई, पत्नीवरही व्यक्तिलेख लिहिले. भारतीय पती पत्नीवर लिहितात हे कुणाला खरे वाटणार नाही. पत्नी प्रभावती कुरुंदकरांशी त्यांचा झालेला विवाह प्रेमविवाह होता. तारुण्याच्या उंबरठ्यावरच ते विवाहित झाले, तेव्हा उभयतांना जग, जीवन, जगणं कळायचं होतं. कुरुंदकर तेव्हा निजाम विरोधी आंदोलनातील तरुण, तडफदार कार्यकर्ते. प्रेमाकर्षणाचं हे एकमेव कारण. मिळकत शून्य असताना लग्न करणं हे प्रेमामुळेच शक्य होतं ना आपल्या पत्नीनं आयुष्यभर जे सोसलं ते 'पत्नी' लेखात अपराधीपणाने परंतु कृतज्ञतापूर्वक प्रांजळतेने त्यांनी प्रभाताई उभ्या केल्यात. सोसलेली पत्नी त्यागी असते म्हणूनच करारीपण असते. तो करारीपणा सोसण्याचीच परिणती असते. एकदा पुरोगामी मुस्लीम चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा नरहर कुरुंदकरांच्या घरी मुक्काम होता. गप्पांत रात्र अंधारी होत गेली. पत्नी जागीच. रात्री बाराला तिने दोघांना चहा दिला ते दलवाई

वाचावे असे काही/१२०