पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लीळा पुस्तकांच्या - नितीन रिंढे,
लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशन - २०१७, पृष्ठे - १८९ किंमत - रु. २५०/-


लीळा पुस्तकांच्या

 नितीन रिंढे हे बहुभाषी वाचक आहेत. आपल्या समृद्ध वाचनानंतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांना लिहावंसं वाचलं. अर्थात 'लीळा पुस्तकांच्या' या ग्रंथात ज्या पुस्तकाबद्दल लिहिण्यात आले आहे, ती सर्व इंग्रजी पुस्तके होत. ही सर्व पुस्तके वाचन व्यवहाराशी संबंधित आहेत. नितीन रिंढे यांनी मुंबईच्या दैनिक 'प्रहार' च्या 'बुकमार्क' पुरवणीत सन २०११-१२ मध्ये लिहिलेल्या मजकुराचे हे संकलन. ती सर्व इंग्रजी पुस्तके विश्वविख्यात लेखकांची. पुस्तकवेडी माणसं, पुस्तक संग्राहक, पुस्तक सहवास, पुस्तक वाचन, पुस्तक इतिहास हे त्यांचे विषय. यात शेवट एक लेख आहे. 'हिटलर : पुस्तक जपणारा की जाळणारा'. तो वाचत असताना लक्षात येते की हिटलर चांगला वाचक होता. त्याच्या संग्रहात विशेष म्हणजे महात्मा गांधी, गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके होती. या नरसंहारक जर्मन हुकूमशहाच्या संग्रहात यांची नि गटे, शिलर, कांटसारख्या तत्त्वज्ञानी लेखकांची पुस्तके कशी याचं आश्चर्य वाटते ते त्याच्या चरित्र, चारित्र्यामुळे नि मनात असलेल्या त्याच्या चित्र, प्रतिमेमुळेही! दुसऱ्या महायुद्धात त्याने साऱ्या ज्यू लेखकांच्या पुस्तकांची होळी करण्याचे फर्मान आपल्या सेनेस काढले. इतिहासात तो 'पुस्तकांचा कर्दनकाळ' म्हणून नोंदला गेला. ३०

वाचावे असे काही/११५