पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केले. रस्ते बांधणीस प्राधान्य दिले. शेतीस प्रोत्साहन दिले. सहकारी संस्था स्थापन केल्या. प्रजाजनांस राजकीय हक्क प्रदान केले. आयर्विन अ‍ॅग्रीकल्चर म्युझियम (आत्ताचे जिल्हाधिकारी कार्यालय) उभारून शेती संशोधन व विकासाचा वस्तुपाठ सुरू केला. ग्रामीण भागात व कोल्हापूर शहरात अनेक पूल (उदा. लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल) उभारून संस्थानास आधुनिक बनवले. पाणीपुरवठा, कुष्ठधाम, रात्रशाळा, तलाठी शाळा, बालवीर चळवळ, तंत्र शिक्षण, वैदिक विद्यालय इत्यादी योजना वाचताना माणूस या लोकराजाच्या लोकदृष्टीचा आवाका पाहून अवाक् होऊन जातो. राजर्षी शाहूंचे स्वप्न हेच होते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा!' 'पुत्रात् इच्छेत पराजयः' पण असते.

◼◼

वाचावे असे काही/१११