पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य
प्रा. डॉ. केशव हरेल
अक्षर दालन प्रकाशन, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर प्रकाशन - ३१ मे, २०१७ पृष्ठे - २५०, किंमत - रु. ३००/-


छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य

 दोन अडीच महिन्यांपूर्वी डॉ. केशव हरेल लिखित ऐतिहासिक ग्रंथ 'छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य' प्रसिद्ध झाला आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध अक्षर दालन प्रकाशनाने त्याची दर्जेदार निर्मिती करून छत्रपती राजाराम महाराज (१८९७ ते १९४०) यांच्या जीवन व कार्याविषयी एका परीने आदरांजलीच वाहिली आहे. प्रा. डॉ. केशव हरेल यांचा हा ग्रंथ मूलतः त्यांचा पीएच.डी. साठीचा संशोधन प्रबंध. प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील यांची सिंहावलोकनपर प्रस्तावना आहे.

 हा एक वाचनीय असा ऐतिहासिक ग्रंथ होय. छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) हे राजर्षी शाहू छत्रपतींचे सुपुत्र होय. आपल्या मुलाचे व्यक्तिमत्त्व आपणासारखे घडावे म्हणून राजर्षांनी केलेल्या प्रयत्नांची शर्थ वाचत असताना पालक, पिता छत्रपती शाहू महाराज आपणापुढे उभे राहतात. युवराज राजाराम सन १९१२ मध्ये १५ वर्षांचे होताच छ. शाहूंनी आपल्या मुलास शिकण्यासाठी विदेशात पाठविण्याचा निर्णय घेऊन त्यांना इंग्लंडला पाठवले. मिसेस आयर्विन या युवराजांच्या तेथील स्थानिक पालक होत्या. त्या

वाचावे असे काही/१०८