पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण पारखे होऊ की काय याची मला साधार भीती वाटू लागली आहे. वर्तमानातील मनुष्य ययातीचं जीवन जगू लागला तसा त्याचा मिडास झालाय. त्यामुळे त्याचं आर्किमिडिज, आईनस्टाईन, सॉक्रेटिस, बुद्ध, महात्मा व्हायचं थांबलं. हा विकास नसून र्‍हास होय. भौतिकापेक्षा बौद्धिक, तार्किक, तात्विक लेखन, वाचन माणसास नुसतं प्रगल्भच नाही करत तर ते त्यास प्रज्ञावान बनवत असतं, हे आपणास विसरून चालणार नाही. जीवनोपयोगी साहित्य चरम क्षणिक सुख देतं पण तुम्हास चिरंतन सुख हवं असेल तर तुम्ही बुद्धी मंथन (Brain Storming) करणारं साहित्यच वाचलं पाहिजे. 'जो न देखे रवी, सो देखे कवि' या काव्यपंक्तीत ज्या अपरासृष्टीचं प्रतिबिंब आहे, ते तुम्हास अनुभवायचं तर कल्पनास्पर्शी लेखनास पर्याय उरत नाही. कल्पना हीच वास्तवाची जननी असते. ती नसती तर सृष्टी स्थितीशील राहिली असती. सृष्टीतील प्रत्येक परिवर्तनामागे कल्पिताचा खटाटोपच कारणीभूत आहे. चाकाचा शोध असो वा शेती, अग्नीचा सारं जन्मलं ते तार्किकातूनच. माणूस इतिहास वाचतो तो 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या शिक्षण नि शिकवणीसाठी. भूगोल वाचतो तो पर्यावरणाचं भान यावं म्हणून. पण इतिहास मिथक जन्माला घालतो नि भूगोल पर्यावरणाचे भान देतो हे खरं. इतिवृत्तात्मक ज्ञान-विज्ञानाने तुम्हास काळाचे तपशील पुरवतात पण कालभान येतं ते ललितामधून!

 साहित्याचं वाचन आपलं बुद्धिमांद्य घालवतं-नवा उत्साह देणारं वाचन वाचकास नव्या मुशाफिरींची स्वप्ने देतं. बहुविध वाचन आपणास अष्टपैलू बनवतं. वाचन माणसाचा केवळ बुद्ध्यांक नाही वाढवत तर ते त्याचा संवेदना सूचकांक ही वधारत असते. गुरुमुखी शिक्षण, विचार, स्वनिरीक्षण, दृक्-श्राव्य साधनांनी मिळणारं ज्ञान, संगणकीय वाचन अशा वैविध्यपूर्ण ज्ञान साधनांनी विकसित होणारे आजचे साहित्य प्रज्ञासंपन्न असते. ते पाहून, चाळून (Browing) चालणार नाही. समुद्राच्या खोल पोटात शिरून मोती वेचणाऱ्या पाणबुड्या (गोताखोर) प्रमाणे वाचन सव्यसाची, उपसणारे (Surffing), पिंजून काढणारे हवे. माणसाचं मन लोखंडासारखं असलं पाहिजे. न वापरता लोखंडी वस्तू नुसती ठेवली तर तांबेरते, गंजते, पण तेच लोखंड वापरले तर त्यास चकाकी, झळाळी येते. वाचनाने बुद्धी तल्लख होते. त्याचं कारण वाचन ही केवळ शब्द क्रिया नाही तर विचार प्रक्रिया आहे. सत्यनारायण पूजेतील आख्यान वाचन, वाचन नव्हे. शब्दोच्चारी

प्रकट वाचन केवळ वाचन कर्मकांड होय. जे वाचन तुमचे विचार बदलून

वाचावे असे काही/९