पान:वाचन (Vachan).pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


व्यत्यास म्हणून उत्तरपक्षीय वाचन त्याचे होत राहते. ते प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते.
१. तुम्ही कुठे, कसे वाचता ते महत्त्वाचे. वाचनाची जागा शांत, प्रकाशित,आल्हाददायक असावी. बैठक व्यवस्था वाचन सुलभ हवी.
२. वाचनाचे ठिकाण व व्यवस्था एकाग्रतापूरक हवे.
३. प्रगटपेक्षा मौन वाचन प्रभावी असते. ते दीर्घप्रभावी आणि स्मरणीय होते.
४.वाचनाची वेळही महत्त्वाची. वाचनाच्या वेळेत विरंगुळा हवा. प्रत्येकाची एकाग्रतेची क्षमता भिन्न असते. त्यानुसार थोडा बदल, विश्रांती परत वाचताना एकाग्रतापूरक ठरते.
५.प्रकाश डाव्या बाजूने हवा म्हणजे लिहिताना सावली आड येत नाही. दिव्याचा प्रकाशही तसाच हवा. तो डोक्यावर असू नये.
६. वायुविजनाची सोय वाचन बैठक (काळ) वाढविण्यास उपयुक्त असते.
७. वाचताना पूर्वनिर्धारित लक्ष्य (Target) हवे. (१० पाने, एक प्रकरण इ.) असे प्रतिबद्ध वाचन हवे. मात्र, ते कंटाळा आला की, उसंत घेऊन मग व्हावे तर ते प्रभावी होते.
८. वाचन तुम्ही जितके एकाग्र, मनापासून कराल तितका वाचन काळ रुंदावता येणे, वाढवणे शक्य असते.
९. प्रत्येक प्रकारच्या वाचनाचे प्रकार काळ, काम, वेगाच्या गणितावर अवलंबून असतात.
१०. वाचन ही स्वेच्छा, प्रतिबद्ध क्रिया असेल तर असे वाचन जलद, प्रभावी, दीर्घजीवी ठरते.
५.६.२ वाचनोत्तर पाठपुरावा
वाचन उपयुक्त व्हायचे तर पाठपुराव्यावर भर हवा -
१. सारांशीकरण
आपण जे वाचतो त्याचा सारसंक्षेप करता येणे म्हणजे वाचलेले हाती लागण्याची निशाणी असते.
२. क्रमवारी

आपण एकाच विषयासंबंधी भरपूर वाचतो तेव्हा त्याचे वर्गीकरण, तर्कसंगत क्रमवारी लावणे म्हणजे प्राप्त ज्ञानाची वैज्ञानिक मांडणी करण्यासारखे असते.

वाचन/८१