पान:वाचन (Vachan).pdf/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वाचन दोष, वाचन गती, शब्द पट, दृष्टी पट इत्यादींचा विचार हा वाचनशास्त्राचा एक विभाग आहे. वाचन शिक्षणशास्त्र, वाचन विद्यापीठ आज अस्तित्वात आले आहे. अमेरिकेत रिडिंग युनिव्हर्सिटी आहे. वाचन प्रभुत्व, अस्खलिता (Fluency) गती वाढविणारे आकलन, क्षमता विकसित करणारे अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. हे शास्त्र विकसनशील (Developing Science)
५.३.६ अंकीय युग आणि वाचन (Reading in Digital Era)   एकविसाव्या शतकातील नववाचकांची बाल, कुमार, किशोर, युवा पिढी पडद्यावर वाचते आहे. पुस्तकांचा नि त्यांचा संबंध दिवसेंदिवस कमी होत आहे. वाचक सर्वेक्षणानुसार, वाचनाचे प्रमाण गेल्या तीन दशकांच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर जात आहे. पारंपरिक पुस्तक वाचणा-यांचे प्रमाणही वर्षाला चार-पाच पुस्तकांवर येऊन ठेपले आहे. साधनांच्या सुकाळाने सर्वांत मोठी गोष्ट जर कोणती गमावली असेल, तर ती वाचन एकाग्रता. चॅटस्, व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज, एसएमएस, ई-मेल्स, व्हिडिओ क्लिप्स, डिजिटल फोटो (डी.पी.), सेल्फी, गिफ्टस् (GIF) या सर्वांतून अंक, अक्षरे, शब्द, वाक्य, परिच्छेद उलट्या दिशेने गायब होत आहेत. भाषा नि लिपीची गल्लत वाचनाचा गुंता वाढवित आहे. मराठी रोमन लिपीत / इंग्रजी लिपीत लिहिली जात आहे- 'Mi yerar nahi' असे संदेश दिले जातात. संदेशांची भाषाही दिवसेंदिवस सूचक होत आहे- 'J1 Zale ka?' (जेवण झाले का) असे लिहिले, विचारले जाते; पण त्यात भाषा आणि लिपी संबंध, भाषिक व्याकरण, विरामचिन्हे इत्यादींचा बोजवारा उडतो आहे. ते विरामचिन्हांशिवाय व उच्चारांची ऐसीतैसी सार्वत्रिक झाली आहे. 'Jl zale ka?', 'jewan gale ka!', 'Zevan Jalhe ka' असं लिहिलेलं तर्कानी वाचायची वेळ येऊन ठेपली आहे. Gn.TC.Sw. म्हणजे 'Good Night. Take Care. Sweet Dream.' असं जाणायचं. तेही पुढे जाऊन आता इमोजीद्वारे सारं दिलं, घेतलं, सांगितलं, केलं जातं.

वाचन (Vachan).pdf

या चिन्हांतूनच बोललं, समजलं, सांगितलं जातं.  भाषा नसण्याच्या काळात माणूस देहबोलीतून सारं सूचित करायचा. गुंफेत तो सूचक चित्र काढू लागला. मग आवाज, ध्वनींना लय, ताल, हस्व, दीर्घ करून त्यानं भाषा विकसित केली. चिन्हातून स्वर, व्यंजने, शब्द, वाक्य, वाक्प्रचार विकसित करत लिहिणारा माणूस छापू लागला. कित्त्यांची पुस्तके झाली. या सर्व प्रवासातून जन्मलेली वाचन प्रक्रिया सजीव होती. ध्वनिमय होती. पुढे तार्किक होत आज सूचक, अतार्किक,

वाचन/७३