पान:वाचन (Vachan).pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


यातून वाचन हे मनोविकासाचे साधन असल्याचे स्पष्ट होते. जी. के. चेस्टर्टन (१८७४-१९३६) या इंग्रजी साहित्यकाराच्या म्हणण्यानुसार, "There is a great deal of difference between the eager man who wants to read a book and the tired man who wants a book to read.1 यातून वाचन हेतू अधोरेखित होतो. वाचन जिज्ञासेने करणे व रंजन म्हणून करणे यात अंतर आहे. चार्ल्स लॅम्ब (१७७५-१८३४) या समीक्षक, विचारकांनी तर नंतरच्या काळात आपले विचार मौलिक ठेवण्यासाठी वाचनच सोडून दिल्याचे सांगितले जाते. यातून माणसावर होणारा वाचना प्रभाव, परिणाम अधोरेखित होतो. गुस्ताव्ह फ्लॉबर्ट (१८२१-१८८०) या फ्रेंच कादंबरीकाराचं वाचनसंबंधी मत सर्वथा अपवाद म्हणावं लागेल. तो म्हणतो, 'Do not read, as children do, to amuse yourself or like the ambitious, for instruction. No, read in order to live.2 वाचन हे लहान मुलांसारखं रंजनासाठी असता कामा नये किंवा एखाद्या महत्त्वाकांक्षी माणसासारखे शिकवण म्हणूनही ते असू नये. वाचन हे जगणे सुंदर करणारे साधन असल्याने 'जीवन त्यांना कळले हो' असं प्रत्यंतर वाचनानंतर यायला हवे.
 वाचन ही एक भाषिक, वाचिक, मानसिक कृती आहे. ती अर्थवाही नि सार्थक व्हायची, तर तिला एका विशिष्ट पठडीतून जावं लागते. अंक वा अक्षर उच्चारण म्हणजे वाचन नव्हे, हे एकदा लक्षात घेतले की मग स्पष्ट होते की, त्यापेक्षा वाचनाचे स्वरूप भिन्न आहे. ती एक बोधगम्य प्रक्रिया आहे. शब्दज्ञान, आकलन, गतिशीलता नि प्रेरणा यांच्या संयुक्त प्रभाव नि परिणामातून वाचन बोधगम्य, ज्ञानवर्धक, प्रेरक, आकलनक्षम होते. वाचनात लिखित वा मुद्रित आशयाचा अन्वय महत्त्वाचा. त्यामुळे वाचन ही ज्ञानप्रक्रिया जशी आहे, तसे ते कौशल्यही आहे. वाचन हा बोधगम्य शोध असल्याने ते आविष्करण आहे. त्याचे प्रभावी प्रगट रूप म्हणजे अभिवाचन, अभिवाचनात आरोह, अवरोह, आघात, अवकाश, स्वर, व्यंजन, शब्दादींचे संयुक्तिक उच्चारण, स्वराभिनय, देहबोली अशा सर्वांगांनी मिळून ती अभिव्यक्ती बनून जाते. वाचन केवळ अंक, अक्षराचे नसते, तर ते चित्र, निसर्ग, माणूस यांचेसुद्धा असते. भाषा, लिपी, साहित्याच्या त्रिवेणी संगमातून वाचनसौंदर्य


(१) A Coprehensive Dictionary of Quotation- Three Ess Publication, Delhi.

(२) --- तत्रैव---

वाचन/६६