पान:वाचन (Vachan).pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पूर्व सुमारे ४००० वर्षे मानण्यात येतो. या लेखनाची भाषा हिब्रू आहे. हे लेखन बायबलपेक्षा जुने आहे. हे डावीकडून उजवीकडे लिहिलेले आहे.
 इजिप्तचे साहित्य हे कॅलेडियन साहित्यानंतरचे प्राचीन साहित्य म्हणून ओळखले जाते. इजिप्तचे साहित्य पपायरसवर लिहिले जात असे. असे सर्वाधिक जुने पुस्तक म्हणजे 'The Book Of Dead' होय. पिरॅमिड्सची निर्मिती इजिप्तमध्ये होत असल्याच्या काळातच हा आद्य जागतिक ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाची प्रत ब्रिटिश म्युझियममध्ये पाहावयास मिळते. या ग्रंथात प्रार्थना, भक्तांची मनोगते, अनुभव, मृत्यूपूर्व इच्छा इत्यादींच्या नोंदी आढळतात. शिवाय त्यात मृत्यूनंतरच्या जीवन अपेक्षा नोंदल्या गेल्या आहेत. अशाच जुन्या ग्रंथांपैकी एक आहे, 'The prophets of pathotep'. पाथ हॉपचा जन्म मेहफीस येथे झाला होता. त्याचा मृत्यू इ.स. पूर्व ३५५० मानण्यात येतो. हे पुस्तकही पपायरसवर लिहिले गेले आहे. हे पुस्तक पॅरीस येथील फ्रान्सच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात आहे. अशा प्रकारची अनेक आद्यलिखित संपदा प्रत्येक भाषेत सुरक्षित असून, वरील ग्रंथ त्यात सर्वाधिक प्राचीन म्हणून ओळखण्यात येतात.
४.५ मुद्रण : उगम आणि विकास
४.५.१ उगम
 कागद अथवा तत्सम पृष्ठावर मुद्रा उठविणे म्हणजे मुद्रण होय. मजकूर अथवा चित्रांच्या अनेक प्रती करण्याच्या गरजेतून मुद्रणकलेचा शोध लागला. पृष्ठावर शाई अथवा रंग लावलेला ठसा अथवा मुद्राक्षरावर दाब देऊन त्याचा छाप उठविणे असे मुद्रणाचे सर्वसाधारण रूप बनले आहे. आता ही क्रिया यंत्राद्वारे होत रोज विकसित होते आहे. मुद्रणतंत्राचा विकास झाल्यापासून ज्ञान संक्रमण, संग्रहण, वहन, प्रेषण, संरक्षणाने ज्ञानास मृत्युंजयी रूप प्राप्त झाले आहे. संदेशवहन, चित्रवाणी, चित्रपट, संगणक, फिती इत्यादींमुळे मजकूर, चित्रेच काय पण ध्वनीमुद्रण, दृश्यमुद्रण (छायाचित्रण) शक्य झाले आहे. मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्याबरोबरीने माहिती व संपर्क क्रांतीतील उपकरण आणि साधन विकासातून मुद्रण कल्पना आता आभासी रुपयापर्यंत येऊन पोहोचली आहे. डाऊनलोड, कॉपी, पेस्ट इत्यादी वर्तमान क्रिया नवे व अत्याधुनिक मुद्रणच होय. एकावेळी एक मजकूर, चित्र, संदेश प्रेषण हे मुद्रण व वितरण, प्रसारणाचे संयुक्त रूपच होय.

 इसवी सनाच्या दुस-या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी चित्र, अक्षरादि मजकूर मुद्रित करण्याचा शोध लावला.

वाचन/५२