पान:वाचन (Vachan).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यातच संगणक, इंटरनेट क्रांतीने ई-बुक व ई-प्रकाशनास प्रारंभ केल्याने ग्रंथ संकल्पनेला छेद मिळून अंकीय आवृत्ती (Digital Edition) अस्तित्वात आली. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणून वाचक संख्येत अगणित वाढ झाली. याने मुद्रण, प्रकाशन, वाचन, लेखन इ. संदर्भातले पूर्वापार आडाखे धुळीला मिळून मुक्त ज्ञान समाज (Free knowledge society) उदयाला आला. वाचन संस्कृती चरमसीमेवर पोहोचली. पाहणेच वाचन होऊन बसले. ग्रंथ गौण ठरले.

कनिख व बौअर यांनी तयार केलेले पहिले स्टॉप-सिलिंडर मुद्रणयंत्र

सोळाव्या शतकातील मुद्रणालयातील विविध क्रिया : (डावीकडून उजवीकडे) मजकुरावरून अक्षरांच्या खिळ्यांची जुळवणी, फर्म्यातील खिळ्यांची दुरुस्ती, खिळ्यांवर शाई लावणे व मुद्रित कागदांचे गठ्ठे लावणे; दाबयंत्राद्वारे दाब देणे, मुद्रित कागद वाळण्यासाठी टांगलेले दिसत आहेत.

वाचन/५०