पान:वाचन (Vachan).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे प्राचीन असून, त्याचा काळ इ.पू. ३००० वर्षे मानण्यात येतो. मेसोपोटेमिया इथे सापडलेले इष्टिका ग्रंथच आदि ग्रंथ/लिखित होय. प्रागैतिहासिक काळापासून आजअखेर मानवाने केलेल्या सातत्यपूर्ण धडपडीतून साध्या चिखलाचे ठोकळे, मग भाजीव विटा, ठसे, ठोकळे, पपायरस, चर्मपत्रे, भूर्जपत्रे, कागद असे लेखनमाध्यम गरजेतून विकसित केले. शाई, रंग, पिसे, बोरू, वेताच्या/ बांबूच्या चिरफळ्या, धातुपत्रे, दाभण, देरो इ. प्रयोग करत तो लेखन व्यवहार सुलभ व टिकावू करत गेला. पूर्वी धर्मस्थळे, मठ, राजवाडे, चर्च, मंदिरे ही ग्रंथनिर्मिती व संरक्षण, संग्रहाची ठिकाणे होती. धर्मसत्तेची जागा राजसत्तेने घेतल्यानंतर ज्ञानाचे केंद्र दरबार झाले. पुढे संतांनी लोक चळवळ उभारली व ज्ञान हे भाषांतर लेखनातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. आधुनिक काळ हा ग्रंथ प्रचार, प्रसाराचा खरा वरदान काळ होय.

इष्टिका ग्रंथ (क्यूनिफॉर्म)
वाचन/४०