पान:वाचन (Vachan).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शाई, रंग, ब्रश, लेखण्या हत्यार साधन विकासात नवनव्या रूपात प्रगट होऊ लागल्या. कोरणाच्या माणसाने पाने, पापुद्रे, चामडे, कापड इत्यादींवर लिहीत कागद शोधला. कागद, शाई, टाक इत्यादी संस्कृती विकासात संग्रह, संदर्भ, संवाद माध्यम बनत व्यापार, व्यवहारासाठी तो पोथ्या, चोपड्या, चवड, बाड बाळगू लागला. ती जपण्याच्या गरजेतून ती बांधणं, चोपडणं, गुंडाळणे, आवरण घालणं शिकत त्याची पुस्तके, ग्रंथ झाले. त्याचीच ग्रंथालये बनून ज्ञानसंग्रह झाला.
४.२ ग्रंथ : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
 ग्रंथ शब्दाचा आशय पुस्तक, बखर, पोथी, चोपडी, चवड, बाड, पाठ अशा अनेक प्रकारच्या शब्दांमधून व्यक्त होत असला तरी पुस्तकाचे जे विद्यमान आधुनिक रूप आहे. तो शब्द पुस्तक हा मूळ संस्कृत पुस्तकं, ‘पुस्तकः'सारख्या शब्दांपासून, प्राकृतातून मराठीत आलेला आहे. त्यात मूळ धातू आहे ‘पुस्त'. पुस्त धातूचा अर्थ होतो वास्तपुस्त, घासणे, चोपडणे, माखणे, लिहिणे, हस्तलेख. पूर्वी जी हस्तलिखिते होती ही सुटी असत. भूजपत्रे, कापड, चामडे, पपायरस इत्यादी स्वरूपात क्रमाने लिहिलेली पत्रे, पाने प्रत्येकवेळी वापरल्यानंतर क्रमाने लावून गठड्यात, आवरणात बांधणे, सुरक्षित ठेवणे हा उद्योग होऊन बसला. मग त्यांना छिद्र करून ओवणे सुरू झाले. मग चिकटविणे आले. बांधणी व चिकटविण्याच्या क्रियेतून पुस्तक आकाराला आले. पहिल्यांदा चामड्यावर, भेंडोळ्यांवर लिहिलेले शिवले गेले. ते अधिक व्यवस्थित ठेवण्याच्या गरजेतून डिंक, सरस आला. मग बांधणी आली.

 आज पुस्तके, ग्रंथ, पुस्तिका, संग्रह, माहितीपत्र, प्रती, आवृत्ती, संहिता, खंड, अध्याय यांच्या जोडकामातून पुस्तक आकारते आहे. पुस्तिकापासून विश्वकोशापर्यंतच्या कथा, कादंबरी, कोश, कविता सारं वाङ्मय, साहित्य, पुस्तकरूप होत. महाग्रंथ, महाकाव्य, महानाट्य बनलं. यामागे माणसाची सतत विकास करण्याची धडपड कारणीभूत आहे. त्या सर्वांमागे पूर्वपरंपरेने पिढी-दर-पिढी चालत आलेलं ज्ञानभांडार सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. राजे-महाराजे, सत्ताधीश, धर्मोपदेशक इत्यादींनी ज्ञानरक्षण, ज्ञाननिर्मिती, ज्ञानप्रचार नि प्रसार इत्यादी कामास धर्माश्रय, राजाश्रय दिल्याने आपण पूर्वसंचित जपू, जोपासू शकलो. ज्ञानविस्ताराचा इतिहास याचीच साक्ष देत आला आहे की प्रत्येक पिढीने कालौघात आपले अनुभव, शोधजन्य योगदान दिले म्हणून निरंतर विकास घडून आला. पोथी, बाड, बखर ते ई-बुक, किंडलचा प्रवास, Talk to Tet. पर्यंतचा विकास ही पुस्तकविषयक

वाचन/३८