पान:वाचन (Vachan).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बोलल्या जाणा-या भाषेचे मूर्त वा शरीरी रूप म्हणजे लेखन होय. लेखन चिन्ह, चित्रे, नकाशे, आकृत्या, अंक, अक्षर इत्यादींद्वारे केले जाते. भाषा ही जशी सामुदायिक संपर्क व्यवस्था असते तशी लिपीपण. लिपी अथवा लेखनामुळे घटना, प्रसंग, व्यवहार इत्यादी नोंद शक्य होत असते.
३.१ लेखन उगम
 नाईल आणि तैंग्रीस नदीच्या सुपीक खो-यात लेखनाच्या आरंभिक पाऊलखुणा (Proto writing) आढळतात. हा परिसर म्हणजे भूमध्य सागराच्या उत्तर सिरिया, युफ्राटिस नदीचे खोरे, इराकचे आखात (पर्शियन गल्फ) इत्यादींचा प्रदेश होय. या प्रदेशातील संस्कृतीत जगातील पहिल्या लेखनाच्या खुणा आढळतात. आजचा इजिप्त आणि इराक आणि तत्कालीन सुमेरियन संस्कृतीचा प्रदेश, इ.स. पूर्व ३१००चा काळ हा प्रारंभिक लेखन उगम, स्थळ व काळ म्हणून जगाच्या इतिहासात ओळखला जातो. प्रारंभिक लेखनाच्या खुणा ‘क्युनिफॉर्म' म्हणून ओळखल्या जाणाच्या मातीच्या ठोकळ्यांच्या रूपात आढळतात. इजिप्तच्या पहिल्या राजवंशाच्या काळात चिखलाच्या विटा, ठोकळ्यांवर अंक लेखन केले जायचे. ते संख्या वाढीतून वस्तू, संच अपुरे पडू लागल्यावर या लेखनास हिइरोग्लिफिक (Hieroglyphic) म्हणून ओळखलं जातं. ओल्या मातीवर अणकुचीदार बोरूने लिहिले जायचे.
 नंतरच्या काळात ध्वनिनिहाय लेखन पद्धती (Hieroglyphic) अस्तित्वात आली ती ग्रीक, रोमन साम्राज्य काळात. मेसापोटेमिया संस्कृतीत अस्तित्वात असलेल्या लेखन पद्धतीपेक्षा ही सर्वथा भिन्न लेखन पद्धती होय. ही लेखन पद्धती पुढे पूर्व युरोपमध्ये (अमेरिका) संक्रमण होऊन इ.स. पूर्व ५०० मध्ये विकसित झाली.

 अणकुचीदार हाडांद्वारे लेखनाची पद्धत चीनमध्ये इ.स. पूर्व १२०० मध्ये उदयास आली. ही लेखन पद्धती पूर्व लेखन पद्धतींचे अनुकरण होते की, स्वतंत्र याबाबत धांडोळा घेताना दिसते की, चीनचा तोवर वरील प्रांत, संस्कृतीशी संपर्क नव्हता. त्यामुळे ही स्वतंत्र लेखन पद्धतीचा म्हणून उदयास आली. त्यातून पुढे चिनी चित्र लिपीचा उदय झाला. ही लेखन पद्धती आज चीनशिवाय थोड्याफार फरकाने जपान, कोरिया इत्यादी देशात आढळते.

वाचन/२७