Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२.१.४ उखाणे, हुमाण, लोकोक्ती

 भजन, ओव्या, पोवाडे, कोडी, उखाणे, ऋतुगीते, उत्सव कथा, हुमाण, वाक्प्रचार, म्हणी, वंश कथा अशा कितीतरी रूपात लोकवाङ्मय, लोकसाहित्य गद्य, पद्य, संवाद, वाक्यांश, शब्द रूपात आजही उपलब्ध आहे. शिवाय प्रचलितही. अल्पाक्षरी जीवन वास्तव आणि भेदकपणे स्पष्ट करण्याच्या स्वयंप्रेरणेतून हे साहित्य निर्माण होत असले तरी समाजशिक्षण व शिकवण त्याचे उद्दिष्ट असायचे. ‘बोध' म्हणून या विविध लोकसाहित्य प्रकारांचे असाधारण महत्त्व आहे. कारण त्यात इतिहास परंपरांचे प्रतिबिंब पडत आले आहे.

वाचन/२४