पान:वाचन (Vachan).pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अंक, अक्षर, बोलता, ओळखता, वापरता आले की केवळ ध्वन्यात्मक आदेशांद्वारे (Voice Command) तो लिखिताचे कार्य करतो व वाचन साक्षर होतो, हे शिक्षण त्याच्या समान वा निकट वयोगटांतील सहाध्यायी, सवंगडी, भावंडे इत्यादींद्वारे मिळते.

 पूर्वी वाचन साक्षरता ही लेखन-वाचनाची संयुक्त प्रक्रिया होती. नव्या तंत्रज्ञान युगातील साधन विकासामुळे लेखन, टंकन ही प्रक्रिया इतिहासजमा होऊ लागली असून, उच्चारण व आकलन समन्वय म्हणजे वाचन साक्षरता झाली आहे. शिवाय ही साक्षरता आता बहुआयामी (Multi Literacy) होते आहे. उच्चारण, आकलन, पाहणे, ऐकणे (दृक-श्राव्य फिती, क्लिप्स, पट इ.) आता वाचन साक्षरतेस बहुविध साक्षरतेचे (Multi Literacy) रूप देत आहेत. कोणताही माणूस सर्वक्षमतासंपन्न असत नाही. त्यामुळे सहयोगी (Per) व समाज घटक यांतून बहुविध साक्षरता उगम पावली असून, ती आता व्यक्तिगत न राहता परस्परपूरक होते आहे. बहक्षम साक्षर (Multiliterate) ही नव्या पिढीची खूण व ओळख बनते आहे. कृतिशील साक्षरता (Functional Literacy) ही तंत्रज्ञान साधन विकासाचे नवे अपत्य होय. आजीवन साक्षरता (Life long Literacy) निरंतर शिक्षण गरजेतून निर्माण होत आहे. 'Reading for life' चे नवे सूत्र म्हणजे आजीवन साक्षरतेचा पाया होय. पूर्वी वाचन हे ज्ञान संपादनाचे साधन, माध्यम होते. बदलत्या परिस्थितीत वाचन हा पूर्ववत (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) शिळोप्याचा उद्योग (Reading for Pleasure and Leisure) झाला नाही तरच आश्चर्य! लिखिताच्या आकलनासाठी आज वाचन, श्रवण, पाहणे, कृती, निरीक्षण, मुद्रण, अंकीय साक्षर (Digital Literate) होणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होऊन बसले आहे. बहुविध साक्षरतेच्या आजच्या काळात माणसाचे बहुभाषी होणे, बहुकुशल असणे, बहुआयामी असणे म्हणजे अष्टावधानी, अष्टपैलू असणे काळाची गरज होय. भाषा ही ज्ञान साधन न राहता साधन प्रयोग (Use of Apps) हीच नव्या युगाची नवी साक्षरता झाली आहे. शिक्षकाचे काम आता शिकविणे नसून, सुविधा उपलब्ध करून देणारा घटक (Facilitator), असे होणे ही काळाचा ङ्कहिङ्का होङ्: शिक्षण कधी काळी chalk and Talk होते, ते आता Plug and Chug झाले आहे. आकलन, उपयोग, प्राधान्य यांवर आता साक्षरता मोजली जाईल. तंत्रकुशल माणूस हा नव्या युगाचा नवा शिल्पकार, शिलेदार राहणार ही काळ्या दगडावरची रेघ होय.

वाचन/९९