पान:वाचन (Vachan).pdf/१६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


असलेल्या अनेक गोष्टी भाषेमुळेच मनुष्य शिकतो. त्यामुळे भाषेला समाजाचे संचित म्हटले जाते. हे समाजाचे संचित 'लोकसाहित्याच्या रूपाने समोर येते. त्यामुळे डॉ. लवटे यांनी पुढच्या प्रकरणात लोकसाहित्याची संक्षेपाने ओळख करून दिली आहे.   भाषा बोलली जाते. बोलण्यासाठी भाषेचा प्रभावी वापर होणे, यावरच तिचे अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही भाषेचे लिखित रूप ही एक सोय असते. बोलणे पकडून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी लेखनकला अस्तित्वात आलेली आहे. या लेखन विकासाचा इतिहास या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. लेखनकला अवगत होण्यापूर्वी अभिव्यक्ती कशी होत होती, त्याविषयीच्या कोणत्या प्रकारे आणि कोठे लेखनखुणा सापडतात याचा घेण्यात आलेला धांडोळा वाचनीय व रोचक आहे. माणूस नेहमी नदीकिनारी सुपीक भागात वस्ती करत आला आहे. त्या अनुषंगाने नाईल आणि तैग्रीस नदीच्या सुपीक खो-यात लेखनाच्या आरंभिक पाऊलखुणा आढळतात. हा प्रदेश भूमध्य सागराच्या उत्तर सिरिया, यूफ्रेटिस नदीचे खोरे, इराकचे आखात असा आहे. त्यामुळे या पाऊलखुणा शोधताना अभ्यासकांना विविध संस्कृतींचे दर्शन आणि मानवाच्या विकासाची वाटचाल लक्षात येते. पुढे लिपीची उत्क्रांती झाली. मानवाचे पहिले लेखन चित्ररूप होते. त्या चित्राक्षरपद्धतीपासून आजच्या आभासी लेखनप्रक्रिये-पर्यंतची उद्बोधक वाटचाल येथे सांगण्यात आली आहे.  लिपीची उत्क्रांती सांगताना या पुस्तकामध्ये अनेक लिप्यांची करून दिलेली ओळख फार महत्त्वाची आहे. धन्वीसूचक वर्ण लिपी, अरबी लिपी, अमेरिका लिपी, उलफिलसची वर्णमाला आणि नंतर भारतीय लिप्यांची ओळख येथे करून देण्यात आली आहे. भारतीय लिप्यांचा उगम आणि विकास हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तो अधोरेखित करण्यात आलेला आहे. भारत हा भाषा आणि संस्कृतीच्या पातळीवर प्रचंड विविधता असलेला देश आहे. या देशामध्ये वापरण्यात येणा-या शेकडो भाषा आणि त्यांच्या लिप्या हा प्रचंड मोठा विषय आहे. भारतातील अनेक भाषांना अद्याप लिप्या नाहीत, परंतु हजारो वर्षांपासून त्या व्यवहारात आहेत. भारतीय लिपी विकासाचा आढावा घेताना गुप्त लिपी, कुटिल लिपी, नागरी लिपी, शारदा लिपी, बंगाली लिपी या उत्तरी शैलीतील लिप्या आणि दक्षिणी शैलीतील पश्चिमी लिपी, मध्य प्रदेशी लिपी, तेलुगू/कानडी लिपी, ग्रंथ

लिपी, कलिंग लिपी, तमिळ लिपी, व कुत्तू लिपी अशी अनेकांसाठी पूर्णतः

वाचन/१६५