पान:वाचन (Vachan).pdf/१५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


देतात केवळ नि केवळ
पुस्तकेच.

पुस्तक असते आई
बाप-भाऊ कधी
ताई, माई, मावशी
कवितेआडून
समजावते चार गोष्टी
जीवाभावाच्या,
सबुरीच्या
सल्ल्याच्या
सभ्यता नि शहाणपणाच्या
म्हणून वाचायची असतात
पुस्तके ! पुस्तके!! आणि पुस्तकेच!!!

नसतात पुस्तके
रुसत कधी
दुखावणारी
हसत राहतात
सदाफुली
म्हणून तर पुस्तके
पासरी भरी.

पुस्तकांचं मैत्र
लाभतं ज्याला
तो खरा भाग्यवंत
वैर ज्याच्या

पदरी येतं

वाचन/१५६