पान:वाचन (Vachan).pdf/१५४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अनर्थाचा सारा इतिहास मात्र मानवी कर्मफळ!

पुस्तकांचा संग्रह म्हणजे विस्मरणास संधी पुस्तक स्मरण आचरण अवधी. विसरायची असतात पुस्तके कृतघ्न ठरविणारी जपायची असतात पुस्तके कृतज्ञ संस्कार म्हणून!


तू रुसलीस तेव्हा मी पुस्तक घेऊन आलो, कळी खुलली गाठ सुटली. मी आजारी पडलो तेव्हा तुझ्या ‘त्या’ पुस्तकाने मला बरे केले

पुस्तके काही न लिहिताही वाचता येतात

पुस्तके डोळ्यात भरलेली असतात नि श्वासात गुंतलेली पुस्तके गुंतागुंत असते

कधी सोडवणूकही

वाचन १५३