पान:वाचन (Vachan).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तके देत राहतात, त्यांनी घेतल्याचा इतिहास नाही. पुस्तके मार्ग दाखवतात, त्यांनी अडवल्याचे आठवत नाही. प्रसंगी ती मार्ग दाखवतात नि बजावतातही या वाटेने नको जाऊ जीवनाची होईल वाटमारी. माणसं का नाही सजीव असून भूमिका बजावत भूमिका घेत जगत ? पुस्तकांसारखी. पुस्तकांना नसते जात, नसतो धर्म, पंथ, असतो विचार केवळ असतो आशय, अर्थ माणसं मात्र आपापल्या सोयीने लावतात अर्थ, करतात अर्थाचा अनर्थ पुस्तकांमुळे अनर्थ घडल्याचा

इतिहास नाही

वाचन/१५२