पान:वाचन (Vachan).pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तके असतात सश्रद्ध, अश्रद्ध नि अंधश्रद्धही! निरपेक्ष, निर्मोही पुरोगामी, प्रतिगामी गांधीवादी, मार्क्सवादी; पण ती आपसात मात्र कधीच करत नसतात वादावादी माणसांसारखी!


पुस्तकं गातात पुस्तकं हितगुज करतात पुस्तकं समजावतात पुस्तकं साथ-संगत, सोबत सर्व सर्व करतात. म्हणून कधी कधी वाटतं जायचंच झालं कधी पुस्तकांसोबत जावं सरणाशेजारीदेखील रचली जावीत पुस्तकं. गोव-या जळत राहतील तिकडे इकडे मात्र पुस्तके उजळलेली! रक्षाविसर्जन दिनी पणती नका ठेवू

ठेवा नंदादीप पुस्तकांचा

वाचन/१५०