पान:वाचन (Vachan).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तक परिचय, समीक्षा, पुरस्कार सारं सारं तसं भौतिकच वाचन, विचार, चर्चा, भेट, देवाण-घेवाण पुस्तकांचा खरा उत्सव आणि उद्धारही... फक्त वाचनच...


पुस्तके युद्धाची कारणे झालीत तरी ती कधीच लढत नसतात पुस्तके फक्त विचार पेरतात. अर्थ तुमचा वकुब शहाणीसुरती माणसं पुस्तके नसतात वाचत तंतोतंत. तत्त्व सार सर्वस्व नुसती नजर फिरवली तरी हाती येतं पाथेय.

पुस्तके मंथन पुस्तके खंडन-मंडन पुस्तके टीका, समीक्षा पुस्तके रसग्रहण, आस्वादन पुस्तके रंजन पुस्तके भक्ती पुस्तके युक्ती

जीवनाची.

वाचन १४९