पान:वाचन (Vachan).pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०. ग्रंथामुळे आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण होतो व शांततामय सहकार्यास मदत होते.   युनेस्कोच्या घटनेत म्हटल्याप्रमाणे, 'युद्धाचा प्रारंभ माणसाच्या मनात होत असल्यामुळे शांततेच्या संरक्षणाची यंत्रणा माणसाच्या मनामध्येच उभारली पाहिजे.' शांततेचे संरक्षण करणा-या महत्त्वाच्या आधारस्तंभांमध्ये ग्रंथांची गणना केली पाहिजे. कारण, स्नेहाचे व परस्पर विश्वासाचे बौद्धिक वातावरण निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ अत्यंत प्रभावीपणे करीत असतात. ग्रंथांतील मजकूर वैयक्तिक पूर्तता, सामाजिक व आर्थिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सलोखा व शांतता यांना पूरक असेल याची खबरदारी घेणे, हे सर्व संबंधितांचे कर्तव्य आहे. {{|||- अनुवाद : एस. ए. सप्रे, संचालक, शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, मुंबई- ३२.}}

वाचन/१२६