पान:वाचन (Vachan).pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथ सनद


भूमिका  सर्व जगाच्या ज्ञानभांडाराचे संरक्षण करण्याचे व त्या ज्ञानाच्या प्रसाराचे ग्रंथ हेच आवश्यक साधन होय अशी खात्री झाल्यामुळे; मुद्रित शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याकरिता प्रोत्साहन देणाच्या धोरणांचा अंगीकार केल्यास ग्रंथांच्या कार्यास नवीन जोम येईल असा विश्वास वाटल्यामुळे;  युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या संस्थेने आपल्या घटनेत 'शब्द आणि प्रतिमा यांच्याद्वारे विचार आणि कल्पना यांचा मुक्त संचार व्हावा व त्याचबरोबर सर्व देशांतील लोकांना इतर कोणत्याही देशात मुद्रित व प्रकाशित झालेले साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता आंतरराष्ट्रीय सहकार्याची प्रतिपादन केलेली आवश्यकता' लक्षात घेऊन;  युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेने आवर्जून प्रतिपादन केल्याप्रमाणे 'ग्रंथ हे युनेस्कोच्या उद्दिष्टांची म्हणजे शांतता, विकास, मानवी हक्कांची जोपासना आणि वंशवाद व वसाहतवाद याविरुद्ध मोहीम यांची पूर्तता करण्याकरिता मूलभूत कार्य करीत असतात हेही लक्षात घेऊन';  युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेने १९७२ हे वर्ष ‘सर्वांकरिता ग्रंथ' या विषयास अनुलक्षून आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष म्हणून जाहीर केले हे विचारात घेऊन, दि इंटरनॅशनल कम्युनिटी ऑफ बुक सेलर्स असोसिएशन्स, दि

इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ सोसायटी ऑफ ऑथर्स अँड कंपोजर्स, दि

वाचन १२१