पान:वाचन (Vachan).pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. पुस्तकात गढून जाण्याचा, रमण्याचा वाचकास हक्क आहे. खरे वाचन हे गारुड असते. तो संमोहक असल्याने त्याची मोहिनी म्हणजे वाचन समाधी. ती निरंतर रहायची तर तिच्यात गढणे, रमणे स्वाभाविकच म्हणायला हवे. गूढ, रहस्यमय, मोहक, आस्वादक वाचन म्हणजे जादूई जग. ते तुम्हास एक नवी अपरासृष्टी दाखवतं. त्यातून नवं जग, ज्ञान जन्मतं. ९. प्रगट, मौन, आकलनमय वाचण्याची वाचकास हक्क आहे. वाचनाच्या अनेक परी आहेत. प्रगट, मौन, चिंतनमय, चेतनादी, आस्वादक, पारायणी, इत्यादी पुस्तकं कसेही वाचण्याचा वाचकास हक्क अशासाठी की, प्रत्येकाच्या क्षमता भिन्न असतात. 'जो जो वांछिल तो ते लाहो' असं म्हणणं म्हणजेच स्वातंत्र्याचे समर्थन असेल, तर ते वाचनासही तंतोतंत लागू आहे. १०. वाचनासंबंधी अभिप्राय, प्रतिसाद, प्रतिक्रिया देण्या न देण्याचा वाचकास हक्क आहे.

आविष्कार जर स्वेच्छा असतो, तर अभिप्राय, प्रतिसाद, प्रतिक्रिया वा तटस्थ राहणेही तसेच असते. वाच्य कृतीबद्दल बोलणे, लिहिणे, मौन धारण करणे सर्वांचे स्वैर स्वातंत्र्य वाचकास आहे. त्याबद्दल कुणास, कुणावर बंदी वा जबरदस्ती करता येणार नाही.

वाचन ११९