पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळापासून या मुद्दयावर विचार होत आलेला आहे. या प्रश्नात गुंतलेल्या अडचणी तेव्हाही सर्वांना जाणवत होत्या, आजही त्या . अडचणी विचारात घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.

समाजवाद्यांची भूमिका

जीवनातील खरे मूलभूत प्रश्न आर्थिक आहेत असे ज्यांना वाटते, त्यांनाही हे आर्थिक प्रश्न समाजजीवनात नानाविध रूपे धारण करतात ही गोष्ट लक्षात घ्यावीच लागते. आपण ज्या समाजरचनेत राहतो आहोत या समाजरचनेचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि मिश्र असे आहे. युरोपमधील विचारवंतांना ज्या संदर्भात विचार करता आला त्या संदर्भात विचार करता येणे आपल्याला कठीण आहे. विचारांचा मूळ गाभा तोच राहिला तरी तपशील देशपरत्वे, कालपरत्वे फार मोठ्या प्रमाणात बदलतो, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य मिळत असताना भारताची परिस्थिती जागोजाग बलवान असणारी सरंजामशाही आणि तिच्या संघर्षात फारसे न येता क्रमाने वाढत चाललेली भांडवलशाही, यांच्या मिश्रणाची अशी होती. स्वातंत्र्योत्तर काळात या परिस्थितीत पुष्कळच बदल होत आलेला आहे सरंजामशाही बरीच दुबळी होऊन कोसळण्याच्या अवस्थेत आलो आहे आणि भांडवलशाही त्या मानाने कितीतरी बलवान झालेली आहे! पण भारतात भांडवलशाहीचा विकास ज्या पद्धतीने झाला त्याचे स्वरूप युरोपातील भांडवलशाहीच्या विकासापेक्षा निराळे आहे दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे निर्माण झालेले अर्थविचारांतील नानाविध प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय भांडवलशाहीच्या विकासात सहभागी राहात आलेले आहेत.

कोटयवधी दरिद्री मंडळींना मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यानंतरसुद्धा या मतदानातून पुरोगामो समाजवादी विचारसरणीचे लोक आणि पक्ष विजयी का होत नाहीत ? या प्रश्नाचा विचार आपण करू लागलो म्हणजे आपल्याला वर्ग आणि वर्ण यांच्या विचाराकडे यावे लागते. अगदी आरंभापासून समाजवादी पक्षातील लोक या मुद्दया

६।