पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वृत्ती यांचा एक चमत्कारिक संबंध अशा संघटनांच्यामध्ये जुळून येत असतो.
आज आपण या प्रश्नाचा पुन्हा एकदा नव्याने विचार केला पाहिजे. जातिव्यवस्था मोडून काढायची ती एकात्म समाज निर्माण व्हावा यासाठी आणि वर्गव्यवस्था मोडून काढायची तीही एकात्म समाज निर्माण व्हावा यासाठीच. सामाजिक आणि आर्थिक न्याय हा समाजरचनेचा पाया म्हणून स्वीकारायचा हेही यासाठीच करायचे. तत्त्व म्हणून हे मान्य केले तरी व्यवहारांत अडचणी येतात. या अडचणींचे स्वरूप एका शब्दात सांगायचे तर असे म्हणावे लागेल की आपल्या कार्यक्रमांमुळे आणि व्यवहारांमुळे जातियवाद वाढतो आहे, जातिनिष्ठ संघटन बलवान होते आहे असे घडता कामा नये. कारण हे जर घडू लागले तर त्याचा शेवट आपल्या ध्येयवादाच्या पराभवात होतो. ही अडचण एकेरी नसून दुहेरी आहे. म्हणूनच वर्ग-वर्ण समन्वयाची भूमिका व्यवहारात अधिक नाजूक होत असते.

हा शोध घ्यायला हवा

संघटनेचा आधार जात, जमात आणि धर्म हा असावा काय ? याविषयी काळजीपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे. मुस्लिम समाजावर कोणताही अन्याय हाऊ नये, त्यांचे सर्व न्याय्य हक्क त्यांना व्यवहारात भोगता यावेत, विकासाच्या सर्व संधी त्यांना उपलब्ध असाव्यात याविषयी दक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याबरोबरच धर्माचा आधार घेतलेल्या मुसलमानांच्या संघटना बलवान होणार नाहीत याहीबाबत दक्ष असण्याची गरज आहे. मुस्लिम लीगशी वाटाघाटी करून किंवा तत्सम धर्मावलंबी संघटनेशी समझोते करून मुस्लिम समाज धर्मनिष्ठ राजकारणाच्या बाहेर आणता येत नाही. आधीच हिंदू समाज बहुसंख्य, त्याचे मन मोठ्या प्रमाणात परंपरावादी, या हिंदू समाजाला जोपर्यंत हिंदूंच्यावर अन्याय करून मुसलमानांचा अनुनय चालू आहे, असे वाटते तोपर्यंत हिंदू जातिवाद

३०।