पान:वनस्पतिविचार.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तयार होतात. बाहेर पडल्यावर केंद्रासभोंवतीं पेशीभित्तिका तयार होते. क्षुद्र वनस्पतीमध्ये ह्या रीतीने पुष्कळ वेळां उत्पत्ति होते.

 उच्चवर्गामध्ये फुलांतील गर्भकोशांत ( Embryo sac ) गर्भस्थापना झाल्यावर गर्भाकरितां अन्नाची सोय होऊ लागते. अन्न उत्पन्न करणाच्या पेशीमध्येसुद्धा ह्याचप्रकारे पुष्कळ वेळां केंद्र द्विधा होते. फुलामध्ये परागवाहिनींत ( Style ) परागकण गेल्यावर त्याच्या पोषणाकरितां पेशीविभाग ह्या रीतीनेच होतात.

 वरील प्रकाराहून आणखी एका रीतीने नवीन पेशी उत्पन्न होते. ही पेशी उत्पन्न होण्यास दोन पेशीची जरूरी असते. या प्रकारांत पेशींची संख्या न वाढतां उलटपक्षी कमी होते. फुलांतील दोन जननपेशींचा मिलाफ होऊन त्यांपासून एकच पेशी बनते. परागनळीतून पुंतत्वपेशी अंडाशयांत (Embryo) शिरून बीजकोशामध्ये ( Embryo Sac ) असणाऱ्या गर्भाण्डपेशाशी एकजीव होऊन गर्भधारणा घडून येते. मात्र ही उत्पन्न झालेली पेशी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ति असते. हे विसरता कामा नये. गर्भ अगर बीज उत्पन्न होणे, हे स्त्रीपुरुषतत्वसंयोगाचा परिणाम होय.

 कधी कधीं क्षुद्र वनस्पतींमध्ये जननपेशी कांहीं काल विश्रांतिस्थितीत असतांना जीवनकण संकुचित होतात व चलनवलनादि क्रिया बंद होतात. जागृतावस्था प्राप्त झाल्याबरोबर पुनः पूर्ववत् सर्व क्रिया सुरू होतात. सजीवतत्व जागृत झाल्यानंतर ते मूळ पेशी सोडून दुसरी पेशी तयार करते, व त्या नवीन पेशीमध्ये जीवनकण, सचेतन शरीरे इत्यादि उत्पन्न करून आपले व्यवहार पूर्ववत् चालू करते. ह्या प्रकारांत मूळ पेशी मृत होऊन त्यापासून दुसरी तयार होते, व पेशींची संख्या न वाढता पूर्वीइतकीच कायम राहते. येथे सजीवतत्त्व कहीं काल स्वस्थ पडून पुनः तरुण होते. ह्यामुळे ह्या प्रकारास ' तरुणावस्थेत शिरणे ' अगर तरुण होणे Rejuvenescence हे नांव यथार्य आहे.

 कळी सोडणे:-Budding; स्वतंत्र केंद्रे एका पेशींत उत्पन्न करून केंद्रागणित एक एक व्यक्ति तयार होणे Free cell formation तरुण होणे (Rejuvenescence) व तसेच स्त्री-पुरुषसंयोगामुळे गर्भधारणा होणे,