पान:वनस्पतिविचार.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

जातात. प्राणिवर्गास गुदद्वारांवाटे विष्ठेत, मूत्राबरोबर, घामांत अथवा श्वासोश्वास क्रियेंत निरुपयोगी त्याज्य पदार्थ बाहेर टाकितां येतात; पण अशी सोय वनस्पतिशरीरांत नसल्यामुळे ह्या रीतीने ते पदार्थ टाकणे भाग पडते.

 केंद्र:-पेशीच्या प्राथमिक स्थितीत सुद्धा तिच्या आकारमानानें केंद्र मोठे असते. पेशी वाढू लागली असतां तीबरोबर ते वाढत नाहीं. बहुतेक केंद्र पूर्वीसारखेंच असते. पेशींत केंद्र असणे हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. केंद्रामध्ये सुट्ठां चलनशक्ति असते. कारण केंद्र आपले मूळस्थान बदलीत असते. केंद्राची घटकद्रव्यें सजीव तत्त्वासारखीच असून ती त्यापेक्षा अधिक घन असतात; ह्यामुळे केंद्र स्पष्ट ओळखता येते. केंद्रासभोंवतीं सजीव कण असतात,

 पेशी विभाग:-एक पेशी किती मोठी वाढली,तथापि त्यापासून वृक्ष थोडाच बनू शकेल ? व्यक्ति मात्र पेशी वाढणे ज्याप्रमाणे जरूर आहे, तद्वतच पेशींची संख्या अधिक वाढणे अत्यंत जरूरीचे आहे. पेशींची संख्या वाढून जेव्हा पुष्कळ पेशी-जालें (Tissues) बनतील त्यावेळेस कदाचित मोठे वृक्ष बनण्याचा संभव असतो. वृक्षांची वाढ पेशींच्या नवीन वाढीवर अवलंबून असते. ह्या वाढीस अन्न, पाणी, हवा, तसेच सूर्यप्रकाश इतक्या गोष्टींची आवश्यकता असते. बीज पेरून त्यांतील गुप्त सजीव तत्त्व जागृत झाल्यावर पुढे त्याच्या चैतन्य शक्तीनें नवीन पेशी उत्पन्न होतात. नवीन उत्पन्न झालेल्या पेशींपासून पेशीविभाग होऊन त्याच्या लाखों पेशी तयार होतात. येणेप्रमाणे बीजापासून तयार होणा-या रोपड्यास कालगतीने वृक्षासारखे मोठे स्वरूप प्राप्त होते.

 पेशींची वर्धकशक्ति प्राथमिक स्थितीत अधिक असते, नवी पेशी उत्पन्न होण्याचे प्रकार पुष्कळ तऱ्हेचे असतात. शिवाय नवीन पेशीं उत्पन्न होऊन सगळ्या एकाच जीवाकरितां अन्नग्रहणादि क्रिया करीत राहतील, तर एक वनस्पति वाढत जाते असे म्हणता येईल. पण जेथे नवीन पेशी उत्पन्न होऊन प्रत्येक स्वतंत्र रीतीने आपला जीवनक्रम चालवू लागते, त्या ठिकाणी निराळ्या व्यक्तींची उत्पत्ती होत असते. बीजापासून मोठी वनस्पति तयार होणे म्हणजे लाखों नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यांचा संघ एकाच वनस्पतींत एकवटून राहणे होय. तसेंच एक जीव कायम राखणे व त्या जिवाच्या जीवनाकरितां सारखी खटपट करणे, हा उद्देश त्या सर्व पेशीसंघाचा असतो; पण किण्व (Yeast)