पान:वनस्पतिविचार.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

कोठडीस जशा चिकटलेली असते व अशा अनेक कोठड्या मिळून एक पोळे झालेले असते, तद्वतच अनेक पेशींची मिळून एक वनस्पति बनलेली असते. अथवा नारिंगें सोलून आंतील मधूर बलक उघडा केला असतां लहान लहान रसमय गठड्या एकमेकांस चिकटलेल्या आढळतात. पैकी एका गठडीची जी आपली कल्पना असते, तीच पेशीसंबंधाने लागू पडते.

 सजीव तत्व (Protoplasm):-पेशीचा मुख्य मालक आंतील सजीव तत्त्व (Protoplasm ) असून या तत्त्वामुळे पेशींत चलनवलनादि खेळ दृष्टीस पडतात. नवीन अन्न शोषण करणे, बाहेरील निरिंद्रिय द्रव्ये पोटांत घेणे व त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनविणे, श्वासोच्छवास करणे, वगैरे क्रिया सजीव तत्त्वामुळे घडतात, सजीवतत्त्वाची घटक द्रव्ये, कारबन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फास्फरस ही आहेत. ती द्रव्ये कोणत्या बरोबर प्रमाणांत परस्पराशी संयोग पावली आहेत, हे निश्चित ठरविता येणार नाही. कारण पृथक्करणाचे वेळीं सजीव तत्त्व मृत होते, व मृत स्थितीमधील पृथक्करण खरे नाहीं. चैतन्यस्थिति गेल्यावर कदाचित त्यामध्ये पुष्कळ रासायनिक फरक होत असतील अथवा चैतन्याचे अभावी त्यांतील एखादें तत्त्व नाहीसे होऊन तें पृथक्करण खरे समजता येणार नाहीं. वरील घटकावयवें सजीव तत्त्वाची न समजतां मृत जड तत्त्वाची आहेत असे समजावे.

 पेशीभित्तिका:--(Celliwall) मधासारखे जाड, पातळ ना घट्ट असे मध्यम प्रकारचे द्रवात्मक चैतन्यशक्ति सजीवत्व पेशीभित्तिकेंत असते. पेशीभित्तिकेचे घटक सत्त्वासारखे असतात. सहा भाग कारबन्, दहा भाग हैड्रोजन व पांच भाग ऑक्सिजन, अशा प्रमाणांत घटक पेशीभित्तिकेंत आढळतात.कापसाचे केसांत जी घटक द्रव्ये आढळतात, तीच द्रव्यें पेशी भित्तिकेमध्ये असतात. पेशी भित्तिका सजीव तत्त्वापासून पातळ पडद्यासारखी बाहेरील बाजूस बनत जाते. सजीव तत्त्वाच्या चैतन्य शक्तीमुळे नवीन नवीन कण बाह्य पडद्याच्या सूक्ष्म रंधांत जाऊन बसतात. जसे जसे जास्त कण पडद्यामध्ये जमतील तसतशी पडदा अगर भित्तिका जाड होते.

 पेशीभित्तिकेंत पाणी कमी अधिक असते. त्यासंबंधी निरनिराळी मते आहेत. प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रवेत्ता नगिली ह्याचे असे म्हणणे आहे की, पेशीघटक द्रव्ये साखरेच्या कणाप्रमाणे चौकोनी, वाटोळी, त्रिकोणी, वगैरे आकाराची