पान:वनस्पतिविचार.pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


४४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

येतात, असा साधारण पुष्कळ वनस्पतींचा नियम आहे. कांहीं विशिष्टबीजदलें जमिनीबाहेर कोंबावर वाढून हिरवी दिसू लागतात. जसे, भोपळा, एरंडी वगैरे.

 खोडावरील पानांची मांडणी:–आपण बारकाईने पानांच्या मांढणीकडे लक्ष्य दिलें असतां असे आढळते की, पाने केवळ वांकडी तिकड़ी अव्यवस्थितपणे खोडावर येतात असे नाही. त्यांच्या येण्याची एक व्यवस्थित रचना असते व ती रचना त्या वनस्पतींमध्ये बहुधा नेहमी आढळते. आगंतुक कारणांनी अगर झाडांच्या कांड्यांत अथवा अंतरकांड्यांत वाढी संबंधानें कमी अधिक फरक झाल्यामुळे कदाचित पानांच्या नेहमीच्या मांडणीमध्ये बदल पडतो. पण हा बदल कायमचा अगर सार्वत्रिक नसतो. कायम व्यवस्थित मांडणी पानामध्ये असणे अगदी अवश्य आहे. जर व्यवस्थित मांडणी नसेल. तर त्यापासून पुष्कळ नुकसान आहे. पानास नेहमी सूर्यप्रकाश सारखा व्यवस्थितपणे मिळणे हे अधिक श्रेयस्कर असते. क्षुद्र वर्गातील कांहीं वनस्पतीस सुर्यप्रकाशाची फारशी जरूरी नसते व त्यांपैकी काहीं तर सूर्यप्रकाश म्हणजे आपला शत्रु असे समजतात. व्यवस्थित मांडणीमुळे पानांस प्रकाश सारखा पोहोचतो. नाहीं तर कांहीं पाने सूर्यप्रकाशाकडे नेहमी वळलेली राहतील, व कांहीं पाने छायेत राहिल्यामुळे फिकट किंवा रोगट दिसु लागतील. कांहीं पाने प्रकाशांत फार तापली जातील व कांही पानें छायेमुळे निरुपयोगी बनतील, श्रमविभागाचे तत्त्व अशा ठिकाणी बिलकूल राहणार नाही. ज्या पानांस फार काम करावे लागते ती लवकरच थकून कामाच्या नालायक होतील, व ज्यांस अगदीच काम नसते ती बोलून चालून निरुपयोगी आहेतच. म्हणूनच अव्यवस्थित मांडणी झाडावर असतां कामा नये, सृष्टिदेवतेने ही गोष्ट लक्ष्यात ठेवूनच पानाच्या सुव्यवस्थित मांडणीची सोय केली आहे. छायेखालीं न येणे किंवा प्रकाश सारखा मिळणे, हे साधण्याकरितां सृष्टिदेवतेने पुष्कळ उपाय केले असतात. कांहीं पानास देठाची योजना करून ते पान खोडापासून वर उचलले असते, किंवा काही ठिकाणीं देंठाचा अभाव असतो. कांहीं झाडांच्या फांद्या उभ्या सरळ येतात, तर काहींच्या आडव्या असून पाने त्यावर सारखी पसरतात, व कांही वनस्पतीमध्ये अंतरकांडी अगर पेरी दीर्घ अगर संकुचित केली असतात. ह्यामुळे पाने कधी कधी जमिनीवर झुपका