पान:वनस्पतिविचार.pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

खालचे भागीं तंतूमय मुळे असतात. पानांचे जाड बुडांमध्ये कांहीं पौष्टिक अन्न सांठविले असते. जसे लसणीच्या कांड्या, कांद्याच्या पांढऱ्या जाड़ पात्या इत्यादि पानांचे पोटीं कळ्या असतात व त्यापासून निराळी रोपे तयार होतात अशा खोडास ‘कंद' (Bulb) म्हणतात.

येथे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी की, सकंदकोष्ठ (Corm) अगर कंद ( Bulb ) ही केवळ एकदलधान्य वनस्पतिमध्ये आढळतात. द्विदलधान्य वनस्पतिमध्ये असली खोडें विरळा असतात.

 कंदकः--(Bulbil) घायपातीचा एक मुख्य सोंट वाढून त्यावर फुलें येतात. ती फुले पक्व होऊन गळून जातात. फुलांच्या देंटावर निराळ्या कळ्या उत्पन्न होऊन त्यांची लहान रोपटी झाडावरच तयार होतात ही रोपटी खाली पडली असता त्यापासून मुळ्या जमीनीत शिरून स्वतंत्र घायपातीची झाडे तयार होतात. शेताच्या कुंपणाभोंवती घायपात लावण्याकरितां हीं तयार असलेली रोपटी लावावीत. ह्याची झाडे, बीजे पेरून उत्पन्न होण्यास वेळ लागतो. शिवाय बीजे फारसी तयार होत नाही म्हणूनच सृष्टिदेवतेने आयती रोपटी झाडावर तयार केली असतात. ह्या रोपट्यास 'कंदक' (Bulbil) हे नांव कंद सादृश्यामुळे दिले आहे. विशेषेकरून हीं कंदकें एकदलधान्यवनस्पतिमध्ये असतात.

 पर्णकोष्ठ-( Phylloclade ) वास्तविक बुंधा अगर फांदी असून त्यांचे स्वरूप बदलल्यामुळे ते दुसरे प्रकार आहेत, असे वाटण्याचा संभव असतो. जसे, निवडुंगाची हिरवीं मोठी पाने. हीं जाडपाने खरोखर पानें नाहींत तर ती शास्त्रीयदृष्ट्या पानासारख्या फांद्या आहेत त्यावर कोंवळ्या स्थितीत येणारी लहान पाने तसेच कांटे व लाल तांबडी बोंडे, ह्यावरून खात्री पटते कीं; ती पाने नसून त्या फांद्या आहेत. केवळ पानांवर अशा प्रकारची फळे वगैरे कधी येत नाहींत. ही गोष्ट खरी की, पानाप्रमाणे ह्या जाड भागांमध्ये हिरवा रंग, पूर्ण वाढतो व त्यामुळेच ती पाने आहेत असे वाटते. सृष्टिदेवतेने त्या जाडभागांत हरिद्वर्ण पदार्थ (Chlorophyll) उत्पन्न करून पानाची सोय केली असते. वास्तविक नेहमी पानांत हरिद्वर्ण पदार्थ असतो. पण येथे पाते लवकर गळून गेल्यामुळे ही तजवीज करणे भाग पडते, जर हरिद्वर्ण पदार्थ त्या भागांत उत्पन्न केला नसता तर हवेतून कार्बन आम्ल शोषून घेण्यास पंचाईत पडली असती. कार्बन आम्लवायू शोषण्यास ह्या हरिद्वर्ण पदार्थाची अवश्य जरूरी