पान:वनस्पतिविचार.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३ रें.].     जनन Germination.     १५
-----

दलांत सांठविलें असते, म्हणून बीजदलासभोंवती अन्नाचे आवरण असण्याची जरूरी नसते. पण जेव्हां एरंडीप्रमाणे बीजदले पातळ असून बीजदलांत अन्न नसते, अशा ठिकाणी अन्नाची सोय बाहेरील अंगास केलेली असते. बीज उगवतांना दोन्ही अन्नाचा उपयोग सारखाच होतो.

 मका-मक्याचा एक दाणा घेऊन तपासला असतां वरील अंग पिवळे व चापट आढळते. एका बाजूस पांढरी खांच असते. पांढऱ्या खांचेवर एक बारीक खरखरीत चिन्ह असते. एक दोन दिवस पाण्यात भिजविलेला दाणा परीक्षणास चांगला असतो. कारण त्यामुळे तो दाणा मऊ होऊन आंतील भाग स्पष्ट दिसतात. पिवळे फोल काढून टाकल्या नंतर बुडाजवळ बीजछिद्र ( Micropyle ) पाहण्यास विसरू नये. मक्यांत पावट्याप्रमाणे दोन डाळिंबी असत नाहींत, मक्याचा उगवता गर्भ एका बाजूस असतो व सभोवती अन्नाचे वेष्टण असते, अन्नाचे बाह्य वेष्टण कठीण व पिवळे असून आंतील भाग पांढऱ्या पिठाचा असतो. मका उगवू लागला असतां उगवत्या कोंबाचें खाली जाणारे अग्र, बीज-छिद्रांतून बाहेर पडते. हे अग्र थोडेसे वाढल्या नंतर दुसरी दोन तंतुमय अग्रे मक्यांतून निघतात, व तिन्ही मिळून मक्यांची प्राथमिक मुळे तयार होतात. वर जाणारे कोंबाचे अग्र सुद्धा ह्याच रीतीने वाढू लागते. त्यावर पाने पावट्याप्रमाणे सुटीं प्रथम दिसत नाहीत. पानाच्या बुडाकडील भाग वाढत्या कोंबासभोंवती गुंडाळलेला असतो व पाने एकामागून एक येऊ लागतात. पावट्याचे मुख्य मूळ प्रथम जमिनीत लांब वर घुसून त्यावर पुढे पोटमुळे येतात, अशी स्थिति येथे नसते. सर्व मुळे साधारणपणे एकाच लांबीरुंदीची असून ती सर्व तंतूमय असतात. त्यांचे मुख्य मूळ असे कोणतेच नसते. मक्यांत गर्भ बाजूस असून त्यांत एकच बीजदल ( Cotyledon ) अथवा डाळिंबी असते, म्हणूनच मका एकदल धान्य वनस्पतिपैकी आहे. गहूं बाजरी, ज्वारी, वगैरे धान्ये ह्याच वर्गाची आहेत.

 मक्याचे दाण्यांत असणारे पौष्टिक अन्न, बीज उगवू लागले असता त्यास उपयोगी पडते, व जेव्हां मुळे व खोड चांगले वाढतात त्यावेळेस त्या दाण्यांतील अन्न कांहीं शिल्लक राहत नाहीं; कारण ते उगवत्यास्थितींत खर्च होते. येथे एवढे लक्षात ठेवावें कीं, एरंडीप्रमाणे मक्यांत गर्भाभोंवतीं अन्नाचा पदर असतो. पावट्यासारखे बीजदलांत अन्न सांठविलेले नसते. मक्याचा दाणा