पान:वनस्पतिविचार.pdf/240

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४     वनस्पतिविचार.
-----

     झ.

झुड Shirub लहान वृक्ष.
झुडुप Bush तुळशी सारखी लहान ठेंगणी झाडे.
झांकणी Cover slip.

     ड.

डोळे भरणे Budding चष्मे करणे, कळ्या फांदींत बसवून कलम करणे.

     त.

तरुण होणे Rejuvenescence.
तंतुकाष्ठ Phloem
तैलोत्पादक पिंड-तैल पिंड Oil gland.

     द.

द्विदली Dicotyledonous दोन डाळिंब्या असणारे.
द्विपाद Dichotomous हा एक फांदीचा प्रकार आहे.
द्विवर्षायु Biennial दोन ऋतू अथवा दोन वर्षे टिकणारे.
दुग्धरस Lates.
दुग्घरस वाहिनी Laticiferous vessel.
द्वार रक्षक पेशी--Guard-cell.
दाबाचे कलम करणे Layering जडवे बांधणे.

     ध.

धावती फांदी Runner हा एक फांदीचा प्रकार आहे.

     न.

नायट्रोजन युक्त पौष्टिक द्रव्ये Proteids ही द्रव्ये सात्विक द्रव्या प्रमाणें पौष्टिक असून त्यांत विशेष द्रव्य ‘ नायट्रोजन' हे आहे. सात्विक द्रव्यांत नायट्रोजन द्रव्यांचा अभाव असतो. पण ह्या ठिकाणीं सात्विक द्रव्याची सर्व मूलतत्वे असून नायट्रोजन, गंधक, व फॉस्फरस् हीं द्रव्यें विशेष आहेत.

निरिंद्रिय Inorganic जी द्रव्ये इंद्रियजन्य नव्हेत तीं. मीठ, सोरा, खडू, वगैरे द्रव्यें निरिंद्रिय आहेत. ह्यांची उत्पात अवयवा पासून होत नसते.