पान:वनस्पतिविचार.pdf/239

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


    पारिभाषिक शब्दांचा कोश.    २१३
-----केसर Filament.
केवल-पुंकेसर Staminate.
केवल-स्त्रीकेसर Pistillate.
कुर्णिका Disc.
कवच Testa.
किण्व Yeast.
कुवच Bark.

     ख.

खांचेदार Pitted खांचा असणारा.

     ग.

ग्रंथीकोष्ठ Tuber गठिीसारखे दिसणारे खोड.
गर्भकोश Embryo-Sac ज्यांत गर्भ असतो तो कोश.
गर्भ Embryo स्त्री पुरुष तत्वांचा संयोग होऊन गर्भ बनतो. गर्भ हा संकुचित स्थितीत असणारा रोपा आहे.
गर्भधारणा Fertilisation.
ग्रंथ्यतराल पदर Medullary ray मध्य रश्मी पदर ( पुष्कळ स्नेह्यांनी ग्रंथ्यंतराल पदरा ऐवजीं मध्य रश्मी पदर सुचविला आहे. हा शब्द पहिल्यापेक्षा चांगला आहे. )
गुच्छ Capitulum हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे.

     छ.

छत्रस्तबक Umbel हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे.

     ज.

जनन Germination उगवणे, बीज-जनन-बीज उगवणे अगर रुजणे.
जडस्थान Vacuole शून्य स्थान. जडस्थानांत सजीवतत्वाचा अभाव असतो पण त्यांत पेशी रस Cell-sap पूर्णपणे भरलेला असतो.
जोडीदार Pinnate जोड्या असलेले.
जडवे बांधणे Layering दाबाचे कलम करणे.