पान:वनस्पतिविचार.pdf/219

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२ वे ].    फळ.    १९३
-----

अग्राकडे फुटत जातात. फळांतील बाह्य पडदे गळून गेले, तथापि बीजें मध्यपापुद्यावर तशीच चिकटून राहतात. मुळ्यांच्या डिंगऱ्या शिरसापेक्षा लहान असून अधिक जाड असतात. त्या इतराप्रमाणे फुटत नाहीत.

 अफू, धोत्रा, कापूस, केशरी बोंड, वगैरे फळे उच्चस्थ व बहुदली असतात. अशा फळास बोंडे म्हणतात. ही बोंडे फुटून बीजे बाहेर गळतात. असली बोंडे पुष्कळ वनस्पतींमध्ये असतात.

 बहुदलवनस्पतींत फळे अग्राकडे निमुळती असतात, त्यामुळे त्यांस कोनाकृति येते. येथे अण्डाशय स्त्रीकेसरदलांनी पूर्ण आच्छादित नसल्यामुळे बीजाण्डे अथवा बीजें उघडी असतात. फळे वाळून ती लाकडांसारखी टणक होतात. प्रत्येक दलावर दोन बीजे असतात. देवदार, सुरू वगेरे उदाहरणे ह्या वर्गापैकी आहेत,

 स्ट्राबेरी, नास्पाती, सफरचंद वगैरे फलें मौल्यवान समजतात. स्ट्राबेरीमध्ये पुष्पाधार ज्यास्त वाढून वरच्या बाजूस अधिक फुगतो. फुगलेल्या भागांत दाणेदार कण असतात. हे फळ म्हणजे केवळ एक पक्व अण्डाशय आहे असे नाहीं, तर पुष्पाधार मांसल होऊन त्यावरील वेगवेगळे लहान लहान अण्डाशय मिळून एक पूर्ण फळ बनते. ह्या फळाची रुचि आंबट-गोड असते. उन्हाळ्यांत ह्या फळांचा उपयोग साहेब लोकांत होतो, त्यामुळे त्यास अधिक किंमत येते, हिंदू लोकांत ह्या फळाचा खप फारसा नसतो.

 नास्पातीं अगर सफरचंद ही फळे आडवी कापून पाहिली असतां मध्यभागी कठीण व टणक अण्डाशय दिसतो. येथे पांच स्त्रीकेसरदले असून प्रत्येकांत दोन बीजें असतात. बाहेरील मांसल भाग पुष्पाधारापासून उत्पन्न होतो. हा मांसल भाग रुचकर असतो. ही फळे खाण्यास पौष्टिक असतात. आजारी माणसांस ह्या फळापासून फार फायदा होतो.

 तुती, फणस, वगैरे फळे साधी नसून त्यांची उत्पत्ति एका फुलापासून न होतां पुष्कळ फुलांच्या समुदायापासून होते. पक्व तुतीचे परीक्षण केले असतां, असे आढळून येईल की, ते फळ पुष्कळ लहान लहान फलांचे बनले आहे, तसेच प्रत्येक फळ वेगळे असते. त्याबद्दलची खुण म्हणजे परागवाहिनीचा अवशिष्ट भाग हा सुद्धा त्यावर पाहण्यास सांपडतो. म्हणजे एका साधारण पुष्पाधारावर पुष्कळ छोटी फळे परस्पर चिकटून एक फळ तयार होते, १३